---Advertisement---

ओव्हलचे मैदान दमदार फलंदाजीने गाजवणारे ३ भारतीय फलंदाज, शास्त्रींचाही समावेश

On: शुक्रवार, सप्टेंबर 3, 2021 12:36 AM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला होता. तर, दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. तसेच तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने जोरदार पुनरागमन करत १ डाव आणि ७६ धावांनी विजय मिळवला होता. ही मालिका सध्या १-१ च्या बरोबरीत आहे. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळू शकतो.

ओव्हलच्या मैदानावर भारतीय संघाची आकडेवारी इतकी खास नाहीये. या मैदानावर भारतीय संघाने १३ सामने खेळले आहेत. यापैकी केवळ एकच सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. परंतु, भारतीय संघातील काही दिग्गज फलंदाज आहेत, ज्यांनी या मैदानावर अप्रतिम फलंदाजी केली आहे. चला तर जाणून घेऊया त्या भारतीय फलंदाजांबद्दल, ज्यांनी या मैदानावर केल्यात सर्वाधिक धावा.

रवी शास्त्री : 
भारतीय संघाचे दिग्गज फलंदाज रवी शास्त्री हे सध्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. रवी शास्त्री यांनी देखील ओव्हलच्या मैदानावर अप्रतिम कामगिरी केली आहे. ते या मैदानावर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहेत. रवी शास्त्री यांनी ओव्हलच्या मैदानावर २ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यातील ३ डावात त्यांनी ८४.३३ च्या सरासरिने २५३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यांनी एक शतक देखील झळकावले आहे. तर १८७ धावा ही त्यांची सर्वोत्तम खेळी आहे.

सचिन तेंडुलकर: 
भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. सचिनने ओव्हलच्या मैदानावर ४ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यातील ६ डावात फलंदाजी करताना त्याने ४५.३३ च्या सरासरीने २७२ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याला या मैदानावर एकही शतक झळकावता आले नाही. ९१ धावा ही त्याची ओव्हलच्या मैदानावरील सर्वोत्तम खेळी आहे.(Three Indian Batsmen with most runs at oval ground agianst England)

राहुल द्रविड:
भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज राहुल द्रविड या यादीत सर्वोच्च स्थानी आहे. त्याने मायदेशात आणि परदेशात अनेकदा भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचे काम केले आहे. तसेच तो ओव्हलच्या मैदानावर भारतीय संघातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. या मैदानावर राहुल द्रविडने ११०.७५ च्या सरासरीने ४४३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने दोन शतक आणि एक अर्धशतक देखील झळकावले आहे. तसेच २१७ धावा ही त्याची या मैदानावरील सर्वोत्तम खेळी आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

चौथा कसोटी सामना ओव्हलवर, पाहा काय सांगतो या मैदानावरील नाणेफेकीचा इतिहास

ईशांतच्या आवाजाची नक्कल करत युवराजने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, पाहा व्हिडिओ

‘आम्ही असा संघ तयार केला, ज्याला पराभूत करण्याचा सर्वांचा प्रयत्न’, शास्त्रीबरोबरच्या संबंधाबद्दल विराटचे भाष्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---