कुठल्याही खेळाडूचं उद्दिष्ट म्हणजे चांगलं प्रदर्शन करून संघात जागा मिळवणं आणि जागा मिळवल्यावर ती टिकवावी सुद्धा लागते. त्यामुळे खेळाडूची ही खरी परीक्षा असते. तसं एखादा खेळाडू एकदा फ्लॉप झाला की संघ त्याला लगेच बाहेर काढत नाही, पण जर तो सतत फ्लॉप होत असेल, तर संघाला त्याबाबत एक निर्णय घ्यावा लागतो. २०२१ मध्ये सुद्धा असे काही खेळाडू आहे, ज्यांना खास प्रदर्शन करता नाही आलं. त्यामुळे संघात जागा टिकवण्यासाठी त्यांना चांगलं प्रदर्शन करणं खूप गरजेचं आहे.
यावर्षी असे ३ खेळाडू आहेत, ज्यांनी खराब प्रदर्शन केलं. त्यामुळे ते आता २०२२ मध्ये चांगलं प्रदर्शन कराण्याचा प्रयत्न करतील. बीसीसीआयने सुद्धा यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. या जाणून घेऊया कोण आहेत ते ३ खेळाडू
१. वरूण चक्रवर्ती (Varun Chakravarthy)
वरुणने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली. परंतु, वर्षाअखेर तो खास प्रदर्शन नाही करू शकला. त्याला मिस्ट्री स्पिनर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्यावरून त्याला टी२० विश्वचषकाच्या (T20 World Cup) संघात घेण्यात आलं. पण अपेक्षेनुसार त्याला प्रदर्शन देता नाही आलं.
त्याने पाकिस्तान, न्यूझीलंड आणि स्कॉटलँड विरुद्ध सामने खेळले आणि त्यात त्याला एकही विकेट नाही घेता आली. त्याने यावर्षीच श्रीलंका दौऱ्यात ३ टी-२० सामने खेळले त्यात त्याने २ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने भारतासाठी २०२१ मध्ये एकूण ६ टी-२० सामने खेळले ज्यात तो फक्त २ विकेट्स घेऊ शकला.
अधिक वाचा – हार्दिक पंड्या पुन्हा बनणार बाप? पत्नी नताशाच्या ‘या’ फोटोंनी चर्चांना उधाण
२. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)
मधल्या फळीतल्या अजिंक्य रहाणेवर आधीपासूनच बीसीसीसीआयची टांगती तलवार आहे. त्याच्याकडून कासोटीचं उपकर्णधारपद सुद्धा काढून घेण्यात आलं. त्याने २०२१ मध्ये १२ कसोटी सामन्यात १९.५७ च्या सरासरीने २ अर्धशतकांसह ४११ धावा केल्या. यावर्षात तो एक शतक सुद्धा नाही करू शकला. तसेच तो दुखापतीशीही झगडताना दिसला.
रहाणेने ७९ कसोटी सामन्यात ४७९५ धावा केल्या आहेत. त्याने भारताचं २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रभारी कर्णधारपद भूषवून भारताला कसोटी मालिकेत २-१ फरकाने विजय मिळवून दिला. त्याने २०१८ मध्ये भारताकडून शेवटचा एकदिवसीय सामना आणि टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.
व्हिडिओ पाहा – बॉक्सिंग डेचा अर्थ, त्याचा इतिहास आणि बरचं काही… |
३. हार्दिक पांड्या (Hardik Pandya)
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या अनेकदा अष्टपैलू कामगिरी करून संघाला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरला. परंतु, २०२१ मध्ये त्याला खास प्रदर्शन करता आलं नाही. त्याने २०२१ मध्ये खेळलेल्या ६ एकदिवसीय सामन्यात २३.८० च्या सरासरीने एका अर्धशतकासह ११९ धावा केल्या. ते अर्धशतक त्याने इंग्लंड विरुद्ध केलं होतं. त्याने इंग्लंड विरुद्ध २८ मार्च २०२१ रोजी ६३ चेंडूत ६४ धावा केलेल्या.
तसेच ११ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात २७.५० च्या सरासरीने १६५ धावा केल्या. त्याने फक्त दोन वेळा ३० चा आकडा पार केला आणि अर्धशतक करण्यात अपयश आलं. त्याच्या दुखापतीमुळे त्याच्या खेळावर परिणाम झाला आहे. तो नियमितपणे गोलंदाजी करताना यावर्षी दिसला नाही. त्यामुळे त्याला संघात जागा टिकवण्यासाठी काहीही करून गोलंदाजी करावीच लागणार आहे. नाहीतर संघ व्यवस्थापनाला त्याला संघाबाहेरच ठेवावं लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिक पंड्याची चाहत्यासोबतची वर्तवणूक पाहून नेटकरी ‘गुश्श्यात’, म्हणाले, ‘भाऊ जुणे दिवस विसरला’
रहाणेला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करताच भडकले भारतीय चाहते; दिल्या संतप्त प्रतिक्रिया