---Advertisement---

न्यूझीलंडचा संघ, ३ सुपर ओव्हर, ६ महिने आणि तो एकच समालोचक!

On: गुरूवार, जानेवारी 30, 2020 3:07 PM
---Advertisement---

हॅमिल्टन। काल(29 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात तिसरा टी20 सामना सेडन पार्क येथे पार पडला. भारताने या सामन्यात सुुपर ओव्हरमध्ये विजय मिळवत 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

मागील 6 महिन्यातील न्यूझीलंडची ही सुपर ओव्हरनंतर पराभूत होण्याची तब्बल तिसरी वेळ आहे. याबरोबरच न्यूझीलंड आणि सुपर ओव्हरच्या बाबतीत आणखी एक अनोखा योगायोग घडला आहे. मागील 6 महिन्यात न्यूझीलंडच्या सुपर ओव्हर झालेल्या तीनही सामन्यात इयान स्मिथ हे समालोचन कक्षात होते.

न्यूझीलंडला मागील वर्षी इंग्लंड विरुद्ध 14 जूलैला 2019 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरही बरोबरी सुटल्यानंतर बाउंड्री काउंटच्या नियमानुसार उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर मागीलवर्षी नोव्हेंबरमध्ये ऑकलँड येथे न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघातच झालेल्या टी20 सामन्यात सुपर ओव्हर झाली होती. यावेळीही न्यूझीलंडला पराभूत व्हावे लागले होते.

त्यानंतर आता कालही न्यूझीलंड भारताविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभूत झाले. विशेष म्हणजे या तीनही सामन्यादरम्यानही इयान स्मिथ समालोचन करत होते.

कालच्या सामन्यादरम्यान समालोचन करताना स्मिथ म्हणाले, ‘जर ही सुपर ओव्हर बरोबरीत संपली, तर मी निवृत्ती घेईल. मी माझ्या आयुष्यातील अनेक वर्षे गमावली(6 महिन्यात 3 सुपर ओव्हरचा विचार करता). पण मला हे आवडत आहे. मला हे खरोखर आवडले आहे.’

मागील 6 महिन्यात न्यूझीलंडच्या सुपर ओव्हर झालेल्या तीनही सामन्यात मार्टिन गप्टिल, रॉस टेलर आणि मिशेल सँटेनर हे देखील न्यूझीलंड संघाचे भाग होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---