पुणे। पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-पीएमडीटीए एआयटीए 18वर्षाखालील चॅम्पियनशीप सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात पुण्याच्या सिद्धार्थ मराठे, अभिराम निलाखे यांनी तर, मुलींच्या गटात प्रिशा शिंदे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये दुसऱ्या फेरीत मुलांच्या गटात पुण्याच्या क्वालिफायर सिद्धार्थ मराठे याने तिसऱ्या मानांकित साहिल तांबटचा 6-1, 6-4 असा तर, पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या अभिराम निलाखेने आठव्या मानांकित राघव अमीनचा 6-2, 6-3 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. अव्वल मानांकित अर्जुन अभ्यंकरने आर्यन घाडगेचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीत चुरशीच्या लढतीत श्रावणी देशमुखने कडवी झुंज देत श्रेया पठारेचा टायब्रेकमध्ये 4-6, 6-1, 7-6(7-2) असा तीन सेटमध्ये पराभव केला. बिगरमानांकीत प्रिशा शिंदेने पाचव्या मानांकित सिया प्रसादेचा 6-2, 6-2असा सहज पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. महाराष्ट्राच्या सिद्धी खोत हिने दिल्लीच्या अर्शिन सप्पलचे आव्हान 6-0, 6-2 असे संपुष्टात आणले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ: दुसरी फेरी: मुले:
अर्जुन अभ्यंकर(महा)[1]वि.वि.आर्यन घाडगे(महा)6-2, 6-3;
ओमर सुमर(महा)[5]वि.वि.आश्विन नरसिंघानी(महा) 6-2, 6-0;
सिद्धार्थ मराठे(महा)वि.वि.साहिल तांबट(महा)[3]6-1, 6-4;
अभिराम निलाखे(महा)वि.वि.राघव अमीन(महा)[8] 6-2, 6-3;
सार्थ बनसोडे(महा)वि.वि.स्वराज ढमढेरे(महा)6-4, 6-1;
पार्थ देवरुखकर(महा)[4]वि.वि.बलवीर सिंग(महा)6-1, 6-2;
अर्णव कोकणे(महा)[7]वि.वि.पियुश जाधव(महा)7-5, 6-3;
अनमोल नागपुरे(महा)[2]वि.वि.ईशान दिगंबर(महा)6-2, 6-1;
मुली:
श्रावणी देशमुख(महा)वि.वि.श्रेया पठारे(महा) 4-6, 6-1, 7-6(7-2);
सेजल भुतडा(महा)[7]वि.वि.रिद्धी शिंदे(महा)6-2, 6-1;
सोनिका जडिश(कर्नाटक)वि.वि.आर्या शिंदे(महा)7-5, 6-0;
प्रिशा शिंदे(महा)वि.वि.सिया प्रसादे(महा)[5] 6-2, 6-2;
डेनिका फर्नांडो(महा)[8]वि.वि.अभिलिप्सा मल्लिक(महा)6-1, 6-1;
सिद्धी खोत(महा)वि.वि.अर्शिन सप्पल(दिल्ली)6-0, 6-2;
श्रुती नानजकर(महा)वि.वि.अनन्या देशमुख(महा)6-0, 6-3;
वैष्णवी चौहान(महा)वि.वि.कनिका बाबर(महा)3-6, 6-2, 6-1;
महत्त्वाच्या बातम्या –
बॅडमिंटन खेळाच्या प्रवासाचा समग्र इतिहास – पी. गोपीचंद
MIvsSRH: पुन्हा एकदा मावळली मुंबईच्या विजयाची आशा! ‘तो’ रनआऊट ठरला टर्निंग पाँईट
सेहवाग का करायचा आक्रमक फलंदाजी? सचिन, द्रविड, लक्ष्मण होते मुख्य कारण