सध्या भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. भारताच्या या दौऱ्याला 12 जुलैपासून सुरुवात होईल. तत्पूर्वी, 5 जुलै रोजी या दौऱ्यातील टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. अनुभवी खेळाडूंना या संघात जागा मिळाली नसली तरी, अनेक युवा खेळाडूंना या संघात संधी दिली गेली. मागील दोन हंगामापासून आयपीएल व देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या तिलक वर्मा याला प्रथमच भारतीय संघात समाविष्ट केलेले आहे. भारतीय संघात संधी मिळाल्यानंतर तिलक याने दिलेल्या मुलाखतीत आपले पहिले प्रतिक्रिया दिली.
रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत तो संघाचा भाग बनल्याने त्याला आपले पदार्पण करण्याची चांगली संधी असेल. याविषयी आपली पहिली प्रतिक्रिया देताना तो म्हणाला,
“भारतीय संघासाठी खेळणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. माझे ते स्वप्न तरी पूर्ण झाले आहे. माझे आणखी एक ध्येय आहे की, मी विश्वचषकात भारतीय संघात खेळावे. मी रोज स्वप्न पाहत असतो की, विश्वचषकात भारताचे 40-50 धावावर चार-पाच गडी बाद झाले आहेत. त्यानंतर मी फलंदाजीला आलो आणि संघाला कशा पद्धतीने अडचणीतून बाहेर काढले. ही गोष्ट सत्यात देखील उतरवण्याची माझी इच्छा आहे. माझी ही इच्छा देखील पूर्ण होऊ शकते.”
तिलकने यावर्षी मुंबईसाठी विविध क्रमांकावर फलंदाजी करताना 14 सामन्यात 397 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याची सरासरी 36 पेक्षा अधिक तर स्ट्राईक रेट 130 पेक्षा जास्त होता. तिलक डावखुरा फलंदाज असल्याने आगामी काळात तो भारतीय संघासाठी देखील महत्त्वाचा फलंदाज म्हणून सिद्ध होऊ शकतो. अनेक जण त्याला भविष्यातील भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज मानत आहे.
(Tilak Varma Hoping He Will Be Consider For ODI World Cup Soon)
महत्वाच्या बातम्या-
हार्दिक आणि विजयसोबतच्या तुलनेविषयी शिवम दुबेचे मोठे विधान; म्हणाला, ‘मी इतर खेळाडूंना…’
माजी सलामीवीराचे धक्कादायक विधान! पहिल्यांदाच भारतीय संघात निवडलेल्या तिलकबद्दल म्हणाला, ‘चुकीचा निर्णय…’