सध्या सय्यद मुश्ताक अली ट्राॅफी (Syed Mushtaq Ali Trophy) ही स्पर्धा खेळली जात आहे. दरम्यान तिलक वर्माने (Tilak Verma) इतिहास रचला आहे. त्याने टी20 फॉरमॅटमध्ये सलग तिसरे शतक झळकावले आहे. तिलकने हैदराबादसाठी झंझावाती खेळी खेळली. त्याने यापूर्वी भारतासाठी सलग 2 शतके झळकावली होती. पुरुषांच्या टी20 क्रिकेटमध्ये सलग तिसरे शतक झळकावणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.
हैदराबादकडून खेळताना तिलकने 67 चेंडूंत 151 धावा ठोकल्या. दरम्यान त्याने 14 चौकारांसह 10 षटकार मारले. या खेळीच्या जोरावर त्याने इतिहास रचला. त्याने टी20 मध्ये सलग तिसरे शतक झळकावले. तिलकने भारताकडून सलग 2 शतके झळकावली होती. त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध एका डावात नाबाद 107 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या सामन्यात नाबाद 120 धावा केल्या होत्या. आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये 151 धावा केल्या.
तिलक वर्माच्या (Tilak Verma) झंझावाती खेळीच्या जोरावर हैदराबादने मेघालयचा 179 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 248 धावा केल्या. तन्मय अग्रवालने 55 धावांची शानदार खेळी केली. तर तिलकने 151 धावा केल्या. प्रत्युत्तरात मेघालयचा संघ 69 धावांवर सर्वबाद झाला. हैदराबादकडून अनिकेत रेड्डीने 4 विकेट्स घेतल्या, तर तन्मय त्यागराजाने 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या.
तिलक वर्माच्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी टी20 मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध 2023 मध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याने भारतासाठी 20 टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 51.33च्या सरासरीने फलंदाजी करताना 616 धावा केल्या. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 120 राहिली आहे. टी20 मध्ये त्याने 2 अर्धशतकांसह 2 शतके झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS; “चेंडू खूप हळू येतोय” जयस्वालने केली स्टार्कची बोलती बंद!
टी20 क्रिकेटमध्ये भुवीचा जलवा! बुमराहला टाकलं मागे; अशी कामगिरी करणारा पहिलाच वेगवान गोलंदाज
राहुल-यशस्वीसमोर ‘किंग कोहली’ही नतमस्तक! मैदानावर येऊन ठोकला सॅल्यूट; VIDEO पाहा