ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी कर्णधार टिम पेन याने सोमवारी (20 मार्च) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. पेनने मागच्याच आठवड्यात देशांतर्गत क्रिटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. अशात सोमवारी (20 मार्च) आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतल्याचे त्याने स्पष्ट केले. पेनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जबरदस्त राहिली, पण शेवट मात्र अनपेक्षित पद्धतीने झाला. त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जानेवारी 2021 मध्ये खेळला होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 35 कसोटी, 35 वनडे आणि 12 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टिम पेन (Tim Paine) याने ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. कसोटी फॉरमॅटमध्ये त्याने 35.63 च्या सरासरीने 1534 धावा केल्या. वनडे फॉरमॅटमध्ये त्याने 890, तर टी-20 आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 82 धावांचे योगदान दिले. नोव्हेंबर 2021 मध्ये पेनवर एका महिलेकडून अश्लील फोटो आणि मेसेज पाठवल्याचा आरोप केला गेला होता. त्यानंतर पेनने सर्वांची माफी मागितली आणि कसोटी संघाचे कर्णधारपद देखील सोडले होते. नोव्हेंबर 2021 पासून पेन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांबच राहिला. 2017 च्या अखेरीस झालेल्या सॅंडपेपर प्रकरणानंतर त्याच्याकडे कसोटी संघाचे कर्णधारपद आले होते. मात्र, भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला मायदेशातच पराभूत केल्याने, त्याच्यावर टीका करण्यात आलेली.
ऍशेस 2021 मालिका अवघ्या काही दिवसांवर आली असताना पेनवर हे आरोप करण्यात आले होते. टास्मानिया क्रिकेटमधील एका महिला कर्मचारीने पेनवर हे आरोप केले होते. या आरोपांनंतर पेनने संघाचे कर्णधारपद सोडले. अशात ऐन वेळी संघाचा उपकर्णधार पॅट कमिन्स याला कर्णधार म्हणून घोषित करण्यात आलेले.
(Tim Paine retires from international cricket)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी अस ऐकलंय की, ही धोनीची शेवटची आयपीएल आहे…’, कॅप्टन कूलविषयी काय म्हणाला शेन वॉटसन?
जेमिसनच्या जागी सिसांडा मगाला सीएसकेच्या ताफ्यात, जाणून घ्या नवख्या खेळाडूवर विश्वास दाखवण्याचे कारण