न्यूझीलंडचा कसोटी कर्णधार टीम साऊथीला बुधवारी (21 ऑगस्ट) सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोत्तम टी20 आंतरराष्ट्रीय गोलंदाज म्हणून निवडण्यात आले. या पुरस्कार समारंभात भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळाला. रोहित शर्मा, विराट कोहली आणि मोहम्मद शमीलाही पुरस्कार मिळाले. सीएट क्रिकेट रेटिंग अवॉर्ड्स दरम्यान, टिम साउथीला विचारण्यात आले की तो इतर कोणत्याही क्रिकेटपटूसोबत तुझे आयुष्य बदलायचे असेल तर तो कोण असेल? आणि का? यावर उत्तर देताना त्याने भारतीय दिग्गज एमएस धोनीचे नाव घेतले आहे.
सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कारा दरम्यान टिम साऊथीला विचारण्यात आले, “जर तुम्ही एका दिवसासाठी इतर कोणत्याही क्रिकेटरसोबत तुमचे आयुष्य बदलू शकलात, तर ते कोण असेल आणि का?” यावर न्यूझीलंडचा कर्णधार म्हणाला, “एमएस धोनी – मी एमएस धोनी झालो तर आयुष्य कसे असेल ते मला पहायचे आहे.”
एमएस धोनी जगातील सर्वात आवडत्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. भारतासाठी तीन आयसीसी ट्रॉफी आणि पाच आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या एमएस धोनीची गणना जगातील महान कर्णधारांमध्ये केली जाते. 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही एमएस धोनी चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. धोनी आता फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. मात्र, गेल्या मोसमात तो गुडघ्याच्या समस्यांशी झुंजत होता आणि पुढच्या मोसमात त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.
न्यूझीलंड कसोटी संघाला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेला जाण्यापूर्वी नोएडा येथे अफगाणिस्तानविरुद्ध एकमात्र कसोटी खेळायची आहे. टीम साऊथीचा संघ ऑक्टोबरमध्ये तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात परतेल, त्यानंतर इंग्लंडविरुद्ध मायदेशात तीन कसोटी सामने खेळेल.
हेही वाचा-
तिसरी पत्नी सना जावेदसोबत स्वित्झर्लंडला पोहोचला शोएब मलिक, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
मेगा लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबादच्या या 3 खेळाडूंवर टांगती तलवार, संघ रिटेन करणार का?
नीरज चोप्राची मोठी झेप, ब्रॅन्ड व्हॅल्यूच्या बाबतीत हार्दिक पांड्याला मागे टाकलं; आता नंबर रोहितचा!