ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनने भारताच्या टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीचे खंडन केले आहे. त्याने म्हटले आहे की त्याने अशी कोणतीही मुलाखत दिलेली नाही.
मात्र यानंतर टाईम्स ऑफ इंडियाने ट्वीटरवर स्पष्टीकरण देत त्यांच्या पत्रकाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. ही मुलाखत सुमीत मुखर्जी यांनी घेतली होती.
रविवारी टाइम्स ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर जॉन्सनची ही मुलाखत प्रकाशित झाली होती. ही मुलाखत प्रश्न आणि उत्तर या प्रकारात लिहिण्यात आली होती. या मुलाखतीत दिल्याप्रमाणे त्याने भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे कौतुक केले होते. पण आता त्याने ट्विट करत त्याने असे काहीही तो बोलले नसल्याचे म्हटले आहे.
या मुलाखतीतील भाग आयसीसीनेही त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केला होता. मात्र यावरही जॉन्सनने प्रश्न उभा केला आहे. या मुलाखतीच्या बाबतीत बुमराहबद्दल ‘तो क्वचितच सैल चेंडू टाकतो. कोणत्याही फलंदाजाला त्याचा सामना करण्यासाठी दोनवेळा विचार करावा लागतो.’, असे जॉन्सनने केलेल्या विधानासह आयसीसीने ट्विट केले होते.
यावर जॉन्सन म्हणाला, ‘हे कोठुन आले आहे? मला काही लक्षात नाही. कोणी लिहिले आहे हे? मला मान्य आहे की यातील काही भाग खरा आहे पण मी कधीही कोणाबरोबर बसून अशी मुलाखत दिलेली नाही.’
https://twitter.com/MitchJohnson398/status/1076868926296838144
त्याच्या या ट्विटनंतर आयसीसीने ती मुलाखत वेबसाईटवरुन काढून टाकली आहे. तसेच आयसीसीने त्याला याबाबत कोणतेही स्पष्टीकरण हवे आहे का असेही विचारले आहे. यासाठी त्याला त्यांच्याशी संपर्क साधण्यास आयसीसीने सुचवले आहे.
Good evening Mitch. Given your Twitter comments, we are going to unpublish the article that features quotes that have been attributed to you. Please get in touch via DM if you'd like to issue a clarification https://t.co/FPF6hyjNFn
— ICC (@ICC) December 23, 2018
त्याचबरोबर टाईम्स ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या मुलाखतीबाबत ट्विट करताना त्याने म्हटले आहे की ‘लेख चांगला आहे पण मी मेलबर्नमध्ये नव्हतो (या मुलाखतीला मेलबर्नची डेटलाइन दिली आहे) आणि मी या पत्रकाराबरोबर बसून मी मुलाखत दिलेली नाही.’
https://twitter.com/MitchJohnson398/status/1076876808560140288
पण त्याच्या या आरोपावर टाईम्स ऑफ इंडियाने सोमवारी (24 डिसेंबर) स्पष्टीकरण दिले आहे. तसेच यामध्ये त्यांनी म्हटले आहे की पारंपारिक पद्धतीने ही मुलाखत घेतली गेली नव्हती. तर समालोचनादरम्यान केलेल्या बातचीतमध्ये या गोष्टी बोलण्यात आल्या होत्या.
याबरोबरच त्यांनी जॉन्सनने आयसीसीला केलेल्या ट्विटमध्ये काही भाग योग्य असल्याचे म्हटलेला ट्विटचा फोटो आणि त्यांच्या पत्रकाराचा जॉन्सन बरोबरचा फोटो शेअर केला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने त्याच्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, ‘सुमीत मुखर्जी यांनी जॉन्सनशी ऑप्टस स्टेडीयम, पर्थ येथे दुसऱ्या कसोटी दरम्यान संवाद साधला होता. त्या संवादाचा भाग या मुलाखतीमध्ये छापण्यात आला आहे.’
ही मुलाखत अनेक छोट्या सत्रांमध्ये घेण्यात आली होता. जेव्हा जॉन्सन समालोचन करत होता. टाईम्स ऑफ इंडिया आपल्या मुलाखतीवर ठाम आहेत.’
TOI stands by its interview with @MitchJohnson398 which was carried on December 23, 2018. Read our statement below. pic.twitter.com/ClYRmVkbmT
— TOI Sports (@toisports) December 24, 2018
मात्र यानंतर पुन्हा ़जॉन्सनने ट्विट करत त्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्याने यात म्हटले आहे की, ‘सेल्फी हे पुरावा असू शकत नाही. मी अनेक चाहत्यांबरोबर असे फोटो काढत असतो. मी अनेक लेख वाचत असतो. त्यामुळे त्यातील काही भाग मला मान्य आहे, पण याचा अर्थ असा नाही की मी काही केले आहे.’
‘तूम्ही दिलेल्या प्रश्न-उत्तर प्रकारानुसार मी कोणतीही मुलाखत दिलेली नाही. जर तूम्ही म्हणत आसाल की ही मुलाखत कसोटी सामन्यादरम्यान झालेल्या संवादातील आहे. तर कोणता भाग त्यातील आहे? मग बाकी सर्व तूम्हाला हवे तसे तुम्ही लिहिले आहे का?’
‘माझ्या लक्षात आहे हा माणुस कसोटी सामन्यादरम्यान मी जेव्हा बाकी पत्रकारांशी बोलत होतो तेव्हा आजूबाजूला फिरुन आमचा संवाद ऐकण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे मी असे समजतो की त्याचे प्रश्न आणि उत्तरे ही मी अन्य लोकांबरोबर केलेल्या चर्चेवर आधारित आहेत.’
https://twitter.com/MitchJohnson398/status/1077211417323786240
महत्त्वाच्या बातम्या:
–खेळाडू संघसहकाऱ्याच नावच विसरला, म्हणाला त्याला देवाने लवकर बरं करो
–ब्रेकिंग- तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा, तीन खेळाडूंना वगळले
–होय मी क्रिकेटमध्ये अजून नविन आहे, म्हणून एवढी मोठी चूक घडली