भारतात सध्या जरी इंडियन प्रीमीयर लीग स्पर्धा सुरु असली तरी झिम्बाव्वेमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले जात आहे. सध्या पाकिस्तानचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या यशस्वी दौऱ्यानंतर झिम्बाव्वे दौऱ्यावर गेला आहे. या झिम्बाव्वे दौऱ्यात पाकिस्तान सध्या ३ टी२० सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूवर फलंदाजाच्या हेल्मेटचे दोन तुकडे झाल्याची अनोखी घटना पाहायला मिळाली आहे.
अशी घडली घटना
हरारे येथे झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातून पाकिस्तानकडून २० वर्षीय अर्षद इक्बालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने पदार्पणातच चमकदार कामगिरी केली आहे. दरम्यान, त्याने या सामन्यात टाकलेल्या डावाच्या ७ व्या षटकातील तिसरा चेंडू इतका जोरात आला की फलंदाजी करत असलेला झिम्बाब्वेचा सलामीवीर तिनाशे कामुन्हुकाम्वेच्या हेल्मेटवर आदळल्याने हेल्मेटचे दोन तुकडे झाले.
अर्षदने हा चेंडू आखुड टप्प्याचा बाऊंसर टाकला होता. ज्यावर कामुन्हुकाम्वेने पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. पण तो चेेंडू मारण्यास चुकला आणि चेंडू त्याच्या हेल्मेटवर आदळला. त्यामुळे हेल्मेटचा वरचा भाग तुटून खाली पडल्याचे दिसले. सुदैवाने कामुन्हुकाम्वेला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
https://twitter.com/TaRiqRizWan345/status/1385533321673945088
कामुन्हुकाम्वेच्या हेल्मेटचे दोन तुकडे झाल्याचे पाहाताच पाकिस्तानचे खेळाडू त्याची विचारपूस करण्यास त्याच्या जवळ गेले. तसेच फिजओने येऊन कामुन्हुकाम्वेला तपासले. त्यानंतर कामुन्हुकाम्वे पुन्हा पुढे खेळण्यास सुरुवात केली.
https://twitter.com/khattaks528/status/1385526894892879873
https://twitter.com/Babar_thechamp/status/1385529987860779011
झिम्ब्वावेचे पाकिस्तानसमोर ११९ धावांचे आव्हान
झिम्बाब्वेकडून कामुन्हुकाम्वेने सर्वाधिक ३४ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त रेगिस चकाब्वा(१८), तरीसाय मुसाकांदा (१३), विझली मधवेर(१६) आणि तेडीवनशे मुरुमनी (१३) यांनाच १० धावांचा आकडा पार करता आला. त्यामुळे झिम्बाब्वेने २० षटकात ९ बाद ११८ धावाच करता आल्या.
पाकिस्तानकडून मोहम्मद हसनैन आणि दानिश अझीजने सर्वाधिक प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच उस्मान कादिर, हॅरिस रौफ, फाहिम अश्रफ आणि अर्षद इक्बाल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. पदार्पण करणाऱ्या अर्षदने त्याच्या ४ षटकात १ विकेट घेताना केवळ १६ धावा दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
वडिलांच्या निधनांतरही खेळली होती आयपीएल, मुंबईविरुद्ध ‘या’ धाकड फलंदाजाला आजमावणार पंजाब?
मुंबई-पंजाबसमोर विजय मार्गावर परतण्याचं आव्हान; ‘अशी’ असेल दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन?
लिलावात नाकारलं तरी मॅक्लेनघनचा इमान मुंबईपाशी, संघ अखेरच्या स्थानी राहिल्यास विकणार सर्व साहित्य