टोकियो ऑलिंपिकमधून भारतासाठी मोठी बातमी आली आहे. भारतीय गोल्फर दीक्षा डगर ऑलिंपिकमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. भारताच्या या युवा गोल्फरला ५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या टोकियो ऑलिंपिकमध्ये महिला गोल्फ स्पर्धेत उशिरा एन्ट्री मिळाली आहे.
दीक्षा महिला गोल्फ स्पर्धेत आपल्याच देशाच्या आदिती अशोकविरुद्धही स्पर्धा करणार आहे. तसेच पुरुष गोल्फ स्पर्धेत अनिर्बन लहिरी आणि उदयन माने टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. (Tokyo Olympic 2020 India Golfer Diksha Dagar Debut Qualifies)
केवळ २० वर्षीय दीक्षा डगर अनेक गोल्फर्सच्या राखीव यादीत होती. मात्र, कासुमीगासेकी कंट्री क्लबमध्ये खेळण्याची तिची शक्यता खूपच कमी होती. तरीही दक्षिण आफ्रिकेची गोल्फर पॉला रेटोने टोकियो ऑलिंपिक २०२० मधून शेवटच्या क्षणी आपले नाव माघारी घेतले. पॉला रेटोसाठी पहिली राखी गोल्फर ही ऑस्ट्रियाची सारा शॉबर होती, परंतु तिलाही या स्पर्धेत खेळण्यास नकार देण्यात आला.
सारा शॉबरला नकार दिल्यानंतर दीक्षासाठी ऑलिंपिकचे दरवाजे मोकळे झाले. पॉलानंतर दुसरी खेळाडू दीक्षा होती आणि तिने या संधीला हातातून निसटू दिले नाही.
BREAKING NEWS Paula Reto (RSA) has withdrawn frm Tokyo & Austria declined reallocation for Sarah Schober; position has been reallocated by IGF to our Diksha Dagar. Best wishes to her.
— IndianGolfUnion (@IndianGolfUnion) July 28, 2021
भारतीय गोल्फरला उत्तर आयर्लंडमध्ये आयएसपीए हांडा वर्ल्ड इनविटेशनल टूर्नामेंट खेळायची आहे. ही स्पर्धा २९ जुलैपासून १ ऑगस्टदरम्यान होईल. मात्र, चिंतेची बाब अशी की, ती आतापर्यंत टोकियोसाठी रवाना झालेली नाही.
दीक्षा ही डाव्या हाताची गोल्फर आहे, जी महिला युरोपियन टूर (LET) मध्ये खेळते. तिने लंडनमध्ये २०१९ दक्षिण आफ्रिका महिला ओपन आणि २०२१ अरामको टीम सीरिज जिंकली आहे.
ही भारतीय खेळाडू सन २०१९ मध्ये व्यावसायिक गोल्फर बनली आणि तेव्हापासूनच ती गोल्फ जगतात आपले नाव गाजवत आहे. दीक्षाने सन २०१७ डीफलिम्पिक्समध्ये कांस्य पदक जिंकले होते. यानंतर तिने सन २०१८ च्या आशियाई स्पर्धेतही त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: पीव्ही सिंधूचा हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धीवर सहज विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
-हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना
-जर्मन महिला जिम्नॅस्टच्या कपड्यांनी वेधले सर्वांचे लक्ष; पण का?