टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये पदार्पण करत असलेले भारतीय नौकानयनपटू विष्णू सर्वनन आणि नेत्रा कुमानन यांचा प्रवास इथेच संपला आहे. कारण, दोघेही आपापल्या गटातील पदकाच्या राऊंडसाठी पात्र ठरण्यात अपयशी झाले आहेत.
विष्णू पुरुषांच्या लेजर स्टँडर्डमध्ये सर्व शर्यतींनंतर ३५ व्या क्रमांकावर राहिला, तर नेत्रा कुमानन १० पात्रता शर्यतींनंतर महिलांच्या लेजर रेडियलमध्ये एकूण ३५ व्या क्रमांकावर राहिली. खरं तर पदकाच्या शर्यतीत अव्वल १० नौकानयनपटूच स्पर्धा ठरतात. (Tokyo Olympics 2020 Sailing India Vishnu Sarvanan Nethra Kumanan Qualifying Results)
ऑस्ट्रेलियाच्या मॅट वेअर्नने पुरुषांच्या लेजर स्पर्धेत ४९ नेट गुणांसह पात्रता शर्यतीत अव्वल स्थान पटकावले.
विष्णूसोबत ऑलिंपिक पदार्पण करत असलेल्या नेत्राचा प्रवासही संपुष्टात आला. ती ९ व्या आणि १० व्या शर्यतीत अनुक्रमे ३७ व्या आणि ३८ व्या क्रमांकावर राहिली. तिच्या या प्रदर्शनाने तिला महिलांच्या लेजर रेडियल गटात एकूण ३५ वे स्थान मिळवून दिले.
#TeamIndia | #Tokyo2020 | #Sailing
Women's Laser Radial Race 9-10 ResultsNethra finished 37th & 38th in Race 9 & 10 to be placed 35th overall. Only top 10 compete in the Medal Race, bringing an end to @nettienetty's debut #Olympics #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/hlIEaFYwqk
— Team India (@WeAreTeamIndia) July 30, 2021
नेत्रा कुमाननने एकूण २५२ गुण मिळवले. दुसरीकडे डेन्मार्कची ऍने मेरी रिंडम ६४ गुणांसह महिलांच्या लेजर रेडियल गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचली.
असे असले तरीही २३ वर्षीय नेत्रा कुमानन ही पात्र ठरणारी पहिली महिला भारतीय नौकानयनपटू आहे. तिने आपल्या १० पात्रता शर्यतींपैकी दोन शर्यतींमध्ये अनुक्रमे तिसरा आणि १५ वा क्रमांक मिळवत आपले सर्वोत्तम प्रदर्शन केले.
यादरम्यान पुरुषांच्या ४९एर स्पर्धेत केसी गणपती आणि वरुण ठक्कर ही जोडी एकूण गुणतालिकेत १७ व्या स्थानावर आहे. भारतीय ४९एर टीम सातव्या, आठव्या आणि नवव्या पात्रता शर्यतीत अनुक्रमे १७ व्या, ११ व्या आणि १६ व्या क्रमांकावर राहिली.
आता केसी गणपती आणि वरुण ठक्करची अंतिम ३ पात्रता शर्यत शनिवारी (३१ जुलै) होईल.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: पीव्ही सिंधूचा हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धीवर सहज विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
-हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना