टोकिया ऑलिंपिकमध्ये भारताची एकमेव जिम्नॅस्ट प्रणती नायक कलात्मक जिम्नॅस्टिक स्पर्धेच्या ऑलराऊंड फायनल्समध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरली आहे. पश्चिम बंगालच्या २६ वर्षीय प्रणती नायकने चार प्रकारात (प्लोर एक्सरसाईज, वॉल्ट, अनइव्हन बार आणि बॅलेन्स बीम) एकूण ४२. ५६५ गुण मिळवले. ती दुसऱ्या सब डिव्हिजननंतर २९ व्या क्रमांकावर राहिली.
पाच सब डिव्हिजनमधून टॉप २४ जिम्नॅस्ट फायनलमध्ये स्थान मिळवतात, जी २९ जुलै रोजी होणार आहे. प्रत्येक प्रकारातील टॉप ८ जिम्नॅस्ट वैयक्तिक स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळतील, जी १ ते ३ ऑगस्टदरम्यान होईल. (Tokyo Olympics Indias Lone Gymnast Pranati Nayak Fails To Qualify For All Round Finals)
#TeamIndia | #Tokyo2020 | #ArtisticGymnastics
Women's Subdivision 1 ResultsGymnast Pranati Nayak finishes 12th in the Qualification Round with an overall score of 42.565 as the event continues. #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/XQ5lwOpshy
— Team India (@WeAreTeamIndia) July 25, 2021
प्रणती सर्वात खालील हाफमध्ये राहिली. तिने फ्लोरमध्ये १०.६३३ गुण मिळवले, तर वॉल्टमध्ये तिचे गुण १३.४६६ होते. अनइव्हन बारमध्ये ३.०३३ आणि बॅलेन्स बीममध्ये तिने ९.४३३ गुण मिळवले.
प्रणतीला ऑलिंपिकच्या तयारीसाठी वेळ मिळाला नाही. कारण, चीनमध्ये २९ मे पासून १ जूनपर्यंत होणारी नववी सीनिअर आशियाई चॅम्पियनशिप रद्द झाल्यामुळे तिला महाद्वीपीय कोट्यातून प्रवेश मिळाला होता. तिने २०१९ आशियाई कलात्मक जिन्मॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये वॉल्टमध्ये कांस्य पदक मिळवले होते.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: भारताची निराशाजनक सुरुवात, नेमबाज मनु आणि यशस्विनी पदकाच्या शर्यतीतून ‘आऊट’
-बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची विजयी सुरुवात, मोठ्या अंतराने प्रतिस्पर्धी पोलिकारपोव्हाला चारली धूळ