न्यूझीलंड क्रिकेट संघाने घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गमावली आहे. पहिले दोन कसोटी सामने गमावल्यानंतर आता न्यूझीलंडचा संघ तिसरा कसोटी सामना खेळत आहे. कालपासून म्हणजेच 14 डिसेंबरपासून तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी फलंदाजी करताना न्यूझीलंडने स्कोअरबोर्डवर 300 हून अधिक धावा केल्या होत्या. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडच्या सलामी जोडीने शानदार सुरुवात केली. कर्णधार टॉम लॅथम आणि विल यंग यांच्यात पहिल्या विकेटसाठी 100 हून अधिक धावांची भागीदारी झाली. 105 धावांच्या सांघिक धावसंख्येवर न्यूझीलंडला पहिला धक्का विल यंगच्या रूपाने बसला. यंगचे अर्धशतक केवळ 8 धावांनी हुकले. यानंतर टॉम लॅथमला आपले अर्धशतक पूर्ण करण्यात यश आले. अशा प्रकारे कर्णधार लॅथमने मोठी कामगिरी केली.
टॉम लॅथमने 102 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह लॅथमने दिग्गज ब्रेंडन मॅक्युलमचा मोठा विक्रम मोडला. टॉम लॅथमच्या कसोटी कारकिर्दीतील हे 31वे अर्धशतक होते. अशाप्रकारे त्याने न्यूझीलंडसाठी कसोटीत सर्वाधिक 50+ धावा करण्यात ब्रेंडन मॅक्क्युलमला मागे टाकले आहे. ब्रेंडन मॅक्क्युलमने कसोटीत 50 पेक्षा जास्त 43 वेळा धावा केल्या होत्या. पण आता टॉम लॅथमने माजी किवी कर्णधाराला मागे टाकले आहे. लॅथम आता कसोटीत चौथ्या क्रमांकावर 50+ धावा करणारा किवी फलंदाज बनला आहे. तर ब्रेंडन मॅक्युलम पाचव्या स्थानावर घसरला आहे. टॉम लॅथमने आतापर्यंत कसोटीत 31 अर्धशतके आणि 13 शतके झळकावली आहेत.
कसोटीत न्यूझीलंडसाठी सर्वाधिक 50+ धावा करणारे फलंदाज
केन विल्यमसन – 69
स्टीफन फ्लेमिंग – 55
रॉस टेलर- 54
टॉम लॅथम- 44
ब्रेंडन मॅक्युलम- 43
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडने 9 गडी गमावून 315 धावा केल्या आहेत. मिचेल सँटनरने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून चौथे कसोटी अर्धशतक पूर्ण केले आणि तो 50 धावांवर खेळत आहे. तर विल ओ’रुर्कने खातेही उघडलेले नाही. आज दुसऱ्या दिवशी किवी संघाला लवकरात लवकर ऑलआउट करण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल.
हेही वाचा-
ज्युनियर आशिया कपच्या अंतिम फेरीत टीम इंडियाचा प्रवेश, विजेतेपदासाठी या संघाशी सामना
2024 मध्ये अनेक दिग्गजांनी घेतली निवृत्ती, यादीत ‘रोहिराट’चाही समावेश
गाबा कसोटीत टॉस जिंकून भारतानं गोलंदाजी का निवडली? रोहित शर्मानं सांगितलं कारण