टी20 क्रिकेटमध्ये मागील काही महिन्यांपासून एक नाव चांगलेच चर्चेत आहे. त्याने त्याच्या स्फोटक फलंदाजीने सगळ्यांना वेड लावले आहे. त्याच्या बॅटींगचे कौशल्य पाहून सामन्या नागरिकच नाही तर आजी-माजी खेळाडूही त्याचे फॅन झाले आहेत. त्याचे नाव सूर्यकुमार यादव. आपल्या 360 डिग्रीने फलंदाजी करणाऱ्या या खेळाडूने मागील वर्षीच भारतीय संघात पदार्पण केले. त्यातच त्याने आयसीसी टी20 फलंदाजी क्रमवारीचा अव्वल क्रमांकही गाठला. त्यावरून ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने म्हटले, ‘सूर्यकुमार सारख्या सर्व खेळाडूंना संघात घ्याच.’
ऑस्ट्रेलियाचे वरच्या फळीतील माजी क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये प्रशिक्षक असणारे टॉम मूडी (Tom Moody) यांनी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या फलंदाजीचे कौतुक करताना आश्चर्यकारक विधान केले. त्यांनी म्हटले, “तो एक खूप प्रतिभावंत खेळाडू आहे. त्याच्यासारखे खूप कमी खेळाडू संघाला लाभतात. अशात जर माझ्याकडे त्याच्यासारखे खेळाडू असते तर त्या सर्वांना मी संघात घेतले असते.”
“सूर्यकुमार कोणत्याही क्रमांकावर उत्तम फलंदाजी करतो. सध्या तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना धावांचा पाऊस पाडत आहे. अशात मी त्याला त्याच क्रमांकावर फलंदाजी करायला सांगेल,” असेही मूडी यांनी इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हटले.
सूर्यकुमारने झिम्बाब्वे विरुद्ध चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 25 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या. या खेळीमध्ये त्याने 6 चौकार आणि 4 षटकार खेचले. तसेच तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 5 सामन्यात 75च्या सरासरीने 225 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 3 अर्धशतके केली आहेत.
टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या उपांत्य फेरीत इंग्लंड, भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड या संघांनी आपली जागा पक्की केली आहे. यातील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार असून तो 9 नोव्हेंबरला सिडनी क्रिकेट ग्राउंडवर पार पडणार आहे. दुसरा सामना भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणार आहे. हा सामना 10 नोव्हेंबरला ऍडलेडच्या ओव्हलवर खेळला जाणार आहे.
सूर्यकुमारचा इंग्लंडविरुद्ध विक्रमही उत्तम आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये एक शतक ठोकले जे त्याने इंग्लंडविरुद्धच केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 क्रिकेट, सूर्या-इंग्लंड कनेक्शन! भारतीय फॅन्ससाठी आनंददायी, विरोधी संंघाची झोप उडवणारी आकडेवारी पाहाच
विराटची फिटनेस भारीच, पण दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाचने पुढच्या सहा वर्षांसाठी दिला ‘हा’ खास सल्ला