काही महिन्यांपुर्वी संयुक्त अरब अमिरातीत इंडियन प्रीमियर लीगचा तेरावा हंगाम यशस्वीरित्या पार पडला. यानंतर लगेचच मार्च-एप्रिल महिन्यात आयपीएल २०२१ची सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आयपीएल फ्रँचायझी जोमाने तयारीला लागल्या आहेत. अशात सनरायझर्स हैदराबाद संघाने त्यांच्या संघ व्यवस्थापनाविषयी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक टॉम मूडी यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
हैदराबाद संघाने ट्विटरद्वारे दिली माहिती
हैदराबाद संघाने ५५ वर्षीय मूडी यांची क्रिकेट संचालक म्हणून निवड केली आहे. २०१९ पर्यंत ते हैदराबाद संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. परंतु, आयपीएल २०२०मध्ये इंग्लंडला विश्वविजेता बनवणारे प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांना मुख्य प्रशिक्षकपदी निवडण्यात आले. परंतु, आता पुन्हा मूडी हैदराबाद संघाशी जोडले गेले आहेत.
सनरायझर्स हैदराबादने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे याविषयी माहिती दिली आहे. हैदराबादच्या ऑफिशिअलने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मूडी यांना सनरायझर्स हैदराबादचे क्रिकेट संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.’ सोबतच त्यांनी मूडी यांचा फोटोही शेअर केला आहे.
???? Announcement ????@TomMoodyCricket has been appointed as the Director of Cricket for SunRisers Hyderabad.#OrangeArmy #KeepRising pic.twitter.com/EGHJNExTTm
— SunRisers Hyderabad (@SunRisers) December 15, 2020
Tom Moody will return to the Sunrisers Hyderabad management team, this time as the franchise's Director of Cricket.
Details ⏬⏬https://t.co/HBw2cP2vxJ
— Cricbuzz (@cricbuzz) December 15, 2020
एकदा जिंकून दिलीय ट्रॉफी
महत्त्वाचे म्हणजे, २०१३ ते २०१९ या ७ वर्षांच्या मोठ्या कालावधीत मूडी यांनी हैदराबाद संघाला प्रशिक्षण दिले आहे. त्याच्या प्रशिक्षणाखाली हैदराबादने २०१६ साली पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. तसेच ५ वेळा संघ प्लेऑफपर्यंत पोहोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नव्या आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीयांची बल्ले-बल्ले; सहा खेळाडू ‘टॉप टेन’मध्ये
सगळे आहेत फक्त तुझीच कमी..! भारताच्या ‘या’ प्रमुख गोलंदाजाच्या अनुपलब्धतेबाबत रहाणेचे मोठे विधान






