आयपीएल 2023 मध्ये आणि किंवा भारतीय क्रिकेटपटू आपल्या खेळाने सर्वांचे मन जिंकत आहेत. फलंदाजीमध्ये शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग व तिलक वर्मा यांनी आपापल्या संघासाठी सर्वोत्तम कामगिरी केलेली दिसते. खासकरून जयस्वाल व गिल यांनी शतके साजरी केली आहेत. गिलने झळकावलेल्या शतकानंतर ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू व समालोचक टॉम मूडी यांनी एक ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधले.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून खेळत असलेल्या शुबमन गिलने आपल्या आयपीएल कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने 58 चेंडूवर 101 धावा केल्या. यामध्ये 13 चौकार व एका षटकाराचा समावेश होता. त्याच्या या खेळीनंतर मुडी यांनी ट्विट करत लिहिले,
Can see it now, Gill and Jaiswal in Blue at the top of the order in all formats for years to come.
The future is bright!— Tom Moody (@TomMoodyCricket) May 15, 2023
“आता आपण स्पष्टपणे पाहू शकतो, लवकरच गिल व यशस्वी जयस्वाल भारतीय संघासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये बराच काळ सलामीला येताना दिसतील. भविष्य खूप उज्वल आहे.”
गिल प्रमाणेच यशस्वी जयस्वाल याने देखील या हंगामात आपल्या फलंदाजीने सर्वांना मोहित केले. त्याच्या नावे देखील एका शतकाचा समावेश आहे. या दोघांच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास गिल याने यावर्षी 13 सामने खेळताना 48 च्या सरासरीने व 146 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने 576 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक व चार अर्धशतकांचा समावेश आहे. दुसरीकडे जयस्वाल याची कामगिरी देखील तशीच राहिली. त्याने राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना 13 साामन्यात 575 धावा केल्या असून, त्याची सरासरी 47.92 अशी राहिली आहे. विशेष म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट हा कमालीचा उंचावून 166 पार पोहोचला. त्याने देखील गिल प्रमाणे 4 अर्धशतके व एक शतक पूर्ण केले आहे. स्पर्धेत सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत हे दोघे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत.
(Tom Moody Praised Yashasvi Jaiswal And Shubman Saying Indian Cricket Future)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गुजरातचा विजयरथ सलग दुसऱ्या हंगामात सुसाट! पुन्हा चालली हार्दिक-नेहराजींची जादू
शमीचा ‘पर्पल पॅच’ सुरूच! सनरायझर्सला लोळवत पुन्हा बनलाय नंबर वन