भारतात क्रिकेटपटू झालं म्हणजे खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडतोच. तसेच आता आयपीएल स्पर्धेमुळे नवख्या खेळाडूंवरही कोटींची बोली लावली जाते. आयपीएल स्पर्धेबद्दल असेही म्हटले जाते की, आयपीएल स्पर्धेत खेळणारा खेळाडू रातोरात श्रीमंत होऊन जातो. तसेच हे क्रिकेटपटू जाहिराती आणि व्यापारातून देखील कोट्यावधी रुपये कमवत असतात. असेही काही खेळाडू आहेत, ज्यांची गणना भारतीय क्रिकेटमध्ये सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. आता तुम्ही म्हणत असाल, आज आम्ही पैसा आणि श्रीमंतीविषयी का बोलतो आहोत, तर आजच्या या लेखाचा विषयच तो आहे. आम्ही तुम्हाला भारतीय क्रिकेट क्षेत्रातील १० सर्वात श्रींमत असलेल्या क्रिकेटपटूंविषयी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते क्रिकेटपटू? (Top 10 Richest Indian cricketers)
१) सचिन तेंडुलकर : भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने क्रिकेटच्या मैदानावर अनेक मोठे विक्रम केले आहेत. दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतक झळकावण्याचा पराक्रम देखील सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. तसेच सचिन तेंडुलकर सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत टॉप-१० मध्ये आहे. सचिन १११० कोटींचा मालक आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी देखील तो जाहिरातींमधून पैसा कमवतोय. तसेच त्याने स्वत:च्या मालकीचे संघसुद्धा आहेत. प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये तो बेंगळुरू ब्लास्टर्स संघाचा मालक आहे. आयएसएलमध्ये त्याचा केरला ब्लास्टर्स नावाचा संघ आहे.
२) एमएस धोनी : सचिन तेंडुलकरनंतर जर भारतात कोणत्याही खेळाडूला लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली असेल, तर तो एमएस धोनी आहे. धोनीची एकूण संपत्ती ७८५ कोटी रुपये आहे. सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
३) विराट कोहली : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने गेल्या काही वर्षात अनेक मोठमोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. दरम्यान सर्वाधिक संपत्ती कमावण्याच्या बाबतीत देखील विराट कोहली पुढे आहे. वर्तमान काळात विराट कोहलीची संपत्ती एकूण ७७० कोटी रुपये आहे. येणाऱ्या काळात हा आकडा वाढू शकतो.
४) सौरव गांगुली : भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली या यादीत चौथ्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती ४१६ कोटी रुपये इतकी आहे.
५) वीरेंद्र सेहवाग : भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा या यादीत पाचव्या स्थानी आहे. मैदानावर चौकार आणि षटकार मारण्याच्या बाबतीत अव्वलस्थानी असलेला सेहवाग पैसे कमावण्याच्या बाबतीतही पुढे आहे. सेहवागची एकूण संपत्ती २८६ कोटी रुपये आहे. तो जाहिरातीतून पैसा कमावतो. तसेच तो समालोचकाची देखील भूमिका पार पाडतो. याव्यतिरिक्त त्याचे मालकीचे हरियाणामध्ये सेहवाग आंतरराष्ट्रीय विद्यालयही आहे.
६) युवराज सिंग : भारतीय संघाचा माजी फलंदाज युवराज सिंग या यादीत सहाव्या स्थानी आहे. त्याची एकूण संपत्ती २५५ कोटी रुपये आहे. क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर देखील युवराजची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली नाही. तो जाहिरातीत झळकत असतो. तसेच त्याचा स्वतःचा व्यवसाय देखील आहे.
७) सुरेश रैना : डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज सुरेश रैना हा एक अप्रतिम क्रिकेटपटू आहे. त्याने अनेकदा कठीण परिस्थितीत भारतीय संघाला विजय मिळवून दिले आहे. तसेच त्याची एकूण संपत्ती १८५ कोटी रुपये आहे.
८) राहुल द्रविड : राहुल द्रविड सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत ८ व्या क्रमांकावर आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी देखील तो जाहिरातीत झळकत असतो. तो नुकताच क्रेडच्या जाहिरातीत झळकला होता. त्याची एकूण संपत्ती १७२ कोटी रुपये आहे. सोबतच तो टिव्ही कॉमेंट्री आणि प्रशिक्षण क्षेत्रातूनही भरपूर कमाई करतो.
९) रोहित शर्मा : भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा याने वनडे क्रिकेटमध्ये तब्बल ३ वेळेस दुहेरी शतक झळकावले आहे. वर्तमान काळात रोहित शर्माकडे १६० कोटींची संपत्ती आहे. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त तो अनेक फॅशन ब्रँड्सला देखील जोडला गेला आहे.
१०) गौतम गंभीर : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर हा सध्या भाजपाचा खासदार आहे. त्याची एकूण कमाई तब्बल १४७ कोटी रुपयांची आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल १२२ वनडे खेळून एकही शतक, एकही सामनावीर पुरस्कार न मिळालेला क्रिकेटर पुढे झाला वकिल
सर्व चौकटी मोडून जगात क्रिकेट समालोचनाचा आदर्श घालून देणारी नेरोली मिडोज