साल २०२१ अवघ्या काही दिवसात संपणार आहे. यावर्षी क्रीडाविश्वात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर क्रीडाविश्वात मागच्या दोन वर्षात खूप मोठा प्रभाव पडला, पण यावर्षी गोष्टी सुरळीत होत असल्याचे पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय पातळीवर टी-२० विश्वचषक, ऑलिम्पिक यांच्यासह इतरही महत्वाच्या स्पर्धा खेळल्या गेले. यादरम्यान अनेक खेळाडूं त्यांच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे चर्चेत आले, तर काही खेळाडू त्यांच्या विवादामुळे चर्चेत आले. आपण या लेखात अशाच यावर्षी घडलेल्या क्रीडाविश्वात १० मोठ्या विवादांवर नजर टाकणार आहोत.
१. विराट कोहली विरुद्ध बीसीसीआय
२०२१ वर्षाचा शेवट होता-होता विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यातील मतभेद जगासमोर आले. यावर्षी खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकानंतर विराटने आधी घोषित केल्याप्रमाणे भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर रोहित शर्माने ही जबाबदारी स्वीकारली. अशात दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने विराटकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद देखील काढून घेतले आणि रोहितला ही जबाबदारी सोपवण्यात आली.
अशा बातम्या समोर आल्या होत्या की, बीसीसीआयने विराटला एकदिवसीय संघाचे कर्णधारपद स्वइच्छेने सोडण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली होती, पण त्याने कर्णधारपद न सोडल्यामुळे ही जबाबदारी काडून घेण्यात आली. परंतु विराटने दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी या सर्व गोष्टींवर स्पष्टीरकण देले. प्रत्रकार परिषदेत विराट म्हणाला की, मला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्याच्या काही तास आधी ही गोष्ट कळाली. तसेच विराटला टी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नको अशी विनंती केली नव्हती.
२. रोहित शर्मा विरुद्ध विराट कोहली
विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यातील वाद पुढे रोहित शर्मापर्यंत देखील गेला. रोहितने दुखापतीमुळे दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली. यानंतर अशाही बातम्या आल्या की, कसोटी मालिकेनंतर खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेतून विराट माघार घेणार. याच पार्श्वभूमीवर क्रिकेटविश्वात अशी चर्चा झाली की, रोहित आणि विराट एकमेकांच्या नेतृत्वात खेळू इच्छित नाहीत. पण नंतर दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराटने या गोष्टीवर स्पष्टीकरण दिले आणि सांगितले की, एकदिवसीय मालिकेत तो उपलब्ध असणार आहे.
३. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात आईपीएलचे आयोजन
यावर्षी भारतात कोरोना विषाणूचा प्रभाव अधिक असताना बीसीसीआयने भारतात आयपीएलचे आयोजन केले. भारतील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक विदेशी खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली, पण बीसीसीआय त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले आणि आयपीएलचे आयोजन केले. अशात आयपीएल स्पर्धा अर्ध्यात असताना काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आणि बीसीसीआयवर स्पर्धा स्थगित करण्याची वेळ आहे. त्यानंतर आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा यूएईत खेळला गेला. चेन्नई सुपर किंग्जने यावर्षी आयपीएलचे जेतेपद जिंकले.
४. डेविड वॉर्नर विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद
आयपीएल २०२१ मध्ये डेविड वॉर्नर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद असा वाद देखील समोर आला. आयपीएल २०२१ च्या मध्यात फ्रेंचायझीने वॉर्नरकडून संघाचे कर्णधारपद काढून घेतले आणि केन विलियम्सनवर ही जबाबदारी सोपवण्यात आली. एवढेच नाही तर, नंतर वॉर्नरला संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून देखील बाहेर केले गेले. परंतु, फ्रेंचायझीच्या या निर्णयाचा काहीच फायदा झाला नाही. यावर्षी सनराजझर्स हैदराबाद संघ गुणतालिकेत सर्वात खाली होता.
५. हार्दिक पांड्याचे 5 करोड रुपयांचे घड्याळ जप्त
यावर्षी टी-२० विश्वचषक यूएईत आयोजित केला गेला होता. टी२० विश्वचषकानंतर मायदेशात परतताना मुंबई विमानतळावर कस्टम डिपार्टमेंटने हार्दिक पांड्याची पाच करोड रुपायंची घड्याळ जप्त केले होते, अशी चर्चा होती. हार्दिककडे या घड्याळाचे बिल नव्हते, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती, असेही म्हटले गेले. त्यानंतर हार्दिकने याप्रकारणी स्पष्टीकारण देताना सांगितले की, घड्याळाची किंमत १.५ करोड रुपये होती आणि तो त्याने स्वत: कस्टम ड्यूटी भरली होती.
६. डब्ल्यूएफआय ने महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला निलंबीत केले होते
दिग्गज महिला कुस्तीपटू विनेश फोगटने टोकियो ऑलिम्पिकदरम्यान नियमांचे उल्लंघन केल्यामुळे भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएपआय) तिला निलंबीत केले होते. तसेच सोनम मलिकला गैरवर्तवणूकीसाठी नोटीस पाठवली होती. विनेश फोगट टोकियो ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामन्यात पराभव मिळाला होता. तिला महासंघाने पाठवलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी १६ ऑगस्टपर्यंत मुदत मिळाली होती.
या नोटीसमध्ये विनेशने तीन नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगितले गेले होते आणि त्याची कारणे स्पष्ट करायला लावली होती. विनेशने टोकियो ऑलिम्पिपदरम्यान इतर भारतीय खेळाडूंसोबत राहाण्यासाठी आणि सराव करण्यासाठी नकार दिला होता. तसेच तिने सामन्यादरम्यान भारताची अधिकृत जर्सी घालण्याऐवजी वेगळी जर्सी घातली होती.
७. मनिका बत्राचा प्रशिक्षकावर फिक्सिंगचा आरोप
भारताची टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्राने टोकियो ऑलिम्पिकनंतर राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांच्यावर फिक्सिंगचे आरोप लावले होते. तिने आरोप केला होता की, प्रशिक्षकांनी तिला मार्च महिन्यात ऑलिम्पिक क्वालियाफायर सामन्यांमध्ये एका सामन्यात पराभूत व्हायला सांगितले होते. याच कारणास्तव तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये स्पर्धेत प्रशिक्षकाची मदत घेण्यास नकार दिला होता.
भारतीय टेबल टेनिस महासंघाने मोनिकाला पाठवलेल्या कारणे द्या नोटीसला देखील तिने उत्तर दिले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने मोनिकाच्या आरोपांचा तपास करण्यासाठी तीन सदस्यीय समिती तयार करण्याचे निर्देश दिले होते.
८. मनु भाकर विरुद्ध प्रशिक्षक जसपाल राणा
मनु भाकर आणि जसपाल राणा यांच्यातील विवाद ऑलिम्पिकच्या आधीचा आहे. मार्च २०२१ मध्ये मनु भाकरचे २५ मिटर पिस्तुल स्पर्धेत सुवर्णपदक हुकले होते. या सामन्यादरम्यान जसपाल राणा एक पांढऱ्या रंगाचा टी शर्ट घालून आले होते आणि या टी शर्टवर लिहिले होते की, “मिळाला ना आनंद… तुमचे आणि अभिषेकचे अभिनंदन… तुमच्या अहंकाराचे अभिनंदन…!” अशी माहिती समोर आली होती की, मनु भाकरने स्वतःच्या हाताने हा संदेश लिहून राणांना पाठवला होता. मनु भाकराच्या ऑलिम्पिकमधील प्रदर्शनाचा विचार केला, तर ते निराशाजनक होते आणि यानंतर हा वाद पुन्हा चर्चेत आला होता.
९. टोकियो ओलंपिकदरम्यान मनु भाकरच्या पिस्तुलमध्ये गडबड
टोकियो ऑलिम्पिकच्या १० मिटर शुटिंग स्पर्धेदरम्यान मनु भाकरच्या एअर पिस्तुलमध्ये बिघाड झाल्यामुळे ती या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचू शकली नव्हती. मनुने सुरुवातीच्या सीरीजमध्ये ९८ -१०० असे उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. परंतु तिच्या पिस्तुलमध्ये गडबड झाली आणि अपेक्षित प्रदर्शन करू शकली नाही. पिस्तुलमध्ये बिघाड झाल्यानंतर तिच्यावर वेळेचा दबाव आला आणि ती १२ व्या क्रमांकावर राहिली, परिणामी अंतिम फेरीत स्थानही बनवू शकली नाही. या घटनेनंतर स्विस पिस्तुल निर्माती कंपनी मोरिनी भारतीय नेमबाज टीमवर प्रश्न उपस्थित केले होते, पण नंतर याबाबत माफीही मागितली होती
१०. मेरी कॉमने ओलंपिकमधील पंचांवर उपस्थित केला होता प्रश्न
सहा वेळा विश्वविजेती ठरलेल्या मेरी कॉमने टोकियो ऑलिम्पिकच्या तिच्या वजनगटात (५१ कि.ग्रा.) उपउपांत्यपूर्व सामन्यात दिल्या गेलेल्या खराब निर्णयासाठी पंचाना कारणीभूत धरले होते. यांदर्भात तिने प्रश्नही उपस्थित केला होता. सामन्यातील तीन पैकी दोन फेऱ्यांमध्ये विजय मिळवून देखील तीला सामन्यात पराभव मिळाला होता. ती यावेळी म्हणाली होती की, “मला नाही माहिती आणि हा निर्णय देखील समजला नाही. पंचांसोबत काय गडबड आहे ? आईओसीसोबत काय गडबड आहे ?”
महत्वाच्या बातम्या –
Ashes: इंग्लंडसाठी पहिले पाढे पंचावन्न! बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व
‘अंतर्गत संभाषण मीडियासमोर आणणार नाही’, भारताच्या नेतृत्त्वबदलाबाबत राहुल द्रविडचे मोठे भाष्य
व्हिडिओ पाहा –