क्रिकेटमध्ये शतकाला एक वेगळेच महत्त्व असते. शतक हा जरी केवळ एक नंबर किंवा आकडा असला तरी त्याचे पहिल्यापासून खेळाडू व क्रिकेटप्रेमींना कायमच कुतुहल राहिले आहे.
सचिनच्या आंतरराष्ट्रीय १०० शतकांची वाट क्रिकेटप्रेमी व स्वत: सचिन कित्येक महिने पाहत होता. परंतु काही असेही क्रिकेटपटू आहे ज्यांनी उच्च दर्जाचे क्रिकेट खेळूनही त्यांना वनडेत किंवा कसोटीत शतक करता आले नाही.
या लेखात वनडेत शतकी खेळी न करता चांगल्या धावा करणाऱ्या ३ भारतीय खेळाडूंची माहिती आपण करुन घेणार आहोत. Top 3 Indian batsmen with most ODI runs without a century.
३. इरफान पठाण (१२० वनडे) (Irfan Pathan)
इरफानने भारताकडून सुरुवातीला एक गोलंदाज म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली परंतु पुढे त्याने फलंदाजीतही किल्ला लढवला. त्यामुळे १२० सामन्यात त्याने ८७ डावात फलंदाजी करताना २३.३९च्या सरासरीने १५४४ धावा केल्या. यात त्याने ५ अर्धशतके केली परंतु त्याला शतकी खेळी करता आली नाही. त्याची वनडे डावातील सर्वोत्तम कामगिरी ८३ राहिली. १५०० हजारपेक्षा जास्त धावा करताना शतक करता न आलेला तो भारतचा तिसरा फलंदाज. इरफानने मात्र कसोटीत एक शतकी खेळी केली आहे.
२. दिनेश कार्तिक (९४ वनडे) (Dinesh Karthik)
दिनेश कार्तिकने भारताकडून १५ वर्षांच्या वनडे कारकिर्दीत ९४ वनडेत ३०.२०च्या सरासरीने १७५२ धावा केल्या. यात त्याने ९ अर्धशतके केली परंतु त्याला कधीही ७९ धावांच्या पुढे जाता आले आहे. शतकी खेळी करता न आलेला व वनडेत १५०० पेक्षा जास्त धावा केलेला तो दुसरा फलंदाज. दिनेश कार्तिकनेे कसोटीत मात्र एक शतकी खेळी केली आहे.
३. रविंद्र जडेजा (१६५ वनडे) (Ravindra Jadeja)
भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने ११ वर्षांत वनडेत १६५ सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याने ३१.८८च्या सरासरीने २२९६ धावा केल्या आहेत. वनडेत २ हजारपेक्षा जास्त धावा करताना शतकी खेळी करता न आलेला जडेजा एकमेव भारतीय फलंदाज आहे. त्याने वनडेत तब्बल १२ अर्धशतके केली आहेत. ८७ या त्याच्या सर्वोत्तम धावा राहिल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-५ भारतीय क्रिकेटपटूंची अतिशय वादग्रस्त वक्तव्य, ज्यामुळे देशात झाला होता राडा
-किंग कोहलीला आवडतो हा फक्त हा काॅमेंटेटर
-आयसीसी वर्ल्ड ११कडून खेळणारे ३ भारतीय महान क्रिकेटपटू