क्रिकेटच्या सुरुवातीला खेळ संथ गतीने चालायचा. त्यामुळे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सुद्धा सुरुवातीला मोठी धावसंख्या पाहायला मिळत नसत. त्यावेळी सामना जिंकण्यासाठी २५० च्या जवळपासची धावसंख्या देखील खूप मानली जायची. त्यामुळे त्यावेळी क्वचितच ३०० धावांचा आकडा पार केला जायचा. परंतु कालांतराने क्रिकेटमध्ये टी-२० सारखा प्रकार आला आणि क्रिकेटची व्याख्याच बदलली. येथूनच पुढे खेळाडू आक्रमकपणे खेळू लागले त्याचाच परिणाम एक दिवसीय सामन्यात आक्रमक खेळी करून केवळ ३०० नव्हे तर ४०० सारखी मोठी धावसंख्या सुद्धा पार करू लागले.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात प्रथम ४०० ची धावसंख्या ऑस्ट्रेलियाने १२ मार्च २००६ साली दक्षिण आफ्रिका विरुद्ध केली होती. तेव्हा ऑस्ट्रेलियाने ४३४ सारखी मोठी धावसंख्या उभी केली होती आणि रंजक गोष्ट म्हणजे याच सामन्यात दुसऱ्यांदा ४०० पेक्षा जास्तची धावसंख्या उभी करण्यात आली होती. दक्षिण आफ्रिकेने त्या सामन्यात ४३४ धावांचा पाठलाग करताना ४३८ धावा केल्या आणि विजय मिळवला होता. एकदिवसीय सामन्यात आतापर्यंत २० वेळा ४०० पेक्षा जास्त धावा करण्यात आल्या आहेत आणि त्यात असे काही संघ आहेत, ज्यांनी अनेक वेळा ४०० पेक्षा जास्त धावसंख्या पार करून विश्वविक्रम रचला आहे.
३) इंग्लंड – इंग्लंड या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे इंग्लंडने आतापर्यंत ४ वेळा ४०० ची धावसंख्या पार केली आहे. इंग्लंडने सर्वप्रथम २०१५ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ४०० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज विरुद्ध ४०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
२) भारत – भारतीय संघ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने आतापर्यंत ५ वेळा हा कारनामा केला आहे. १९ मार्च २००७ साली भारताने पहिल्यांदा बरमूडा विरुद्ध ४०० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्यानंतर श्रीलंका विरुद्ध २ वेळा आणि दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज विरुद्ध देखील १-१ वेळा ४०० पेक्षा जास्तची धावसंख्या भारताने पार केली आहे
१) दक्षिण आफ्रिका – या यादीत पहिल्या स्थानावर दक्षिण आफ्रिका आहे. दक्षिण आफ्रिकेने ६ वेळा ४०० ची धावसंख्या पार करण्याचा कारनामा केला आहे. २००६ साली ऑस्ट्रेलियाच्या ४३४ च्या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच ४०० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्यावेळी एकदिवसीय क्रिकेटमध्ये एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा पराक्रम इतिहासात प्रथमच घडला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने वेस्टइंडीज, आयर्लंड, झिंबाब्वे आणि भारताच्या विरुद्ध ४०० पेक्षा जास्तची धावसंख्या पार केली आहे
महत्त्वाच्या बातम्या-
‘भारतीय संघ आहे तो, हारेल पण माघार घेणार नाही’; पाकिस्तानातून धवनसेनेच्या धैर्याचे कौतुक
‘या’ ३ क्रिकेटपटूंसाठी भारतीय संघाची दारे झाली कायमची बंद! पुनरागमनाच्या आशा धूसर
हृदय जिंकलंस! ज्यांनी टी२० मालिकेत दिला दारुण पराभवाचा धक्का, त्यांनाच ‘गब्बर’ने दिला बहुमुल्य वेळ