टी २० क्रिकेटच्या आगमनाने पूर्ण क्रिकेटची परिभाषा बदलली आहे. सुरुवातीच्या काळात यष्टिरक्षक हा यष्टिमागील आपल्या योग्य कामगिरीसाठी ओळखला जात असे. संघात जागा बनवण्यासाठी यष्टिरक्षकाला आपल्या यष्टिमागील कौशल्यात निपुणता असणे गरजेचे होते. मात्र वर्तमान काळात कोणत्याही यष्टिरक्षकाला संघात जागा बनवण्यासाठी आपल्या फलंदाजीत योग्य कौशल्य बाळगणे देखील तितकेच गरजेचे झाले आहे. अशा परिस्थितीत वर्तमान काळातील यष्टिरक्षक आपल्या फलंदाजीने सर्वांची वाहवा मिळवत आहेत.
आपण या लेखात बघणार आहोत टॉप ३ यष्टिरक्षक ज्यांनी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वोच्च धावांची खेळी केली आहेत.
३) ब्रेंडन मॅक्युलम (८१ धावा विरुद्ध झिंबाब्वे) –
न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमने २०११ साली झिंबाब्वे विरुद्ध खेळताना ८१ धावांची खेळी केली होती. झिंबाब्वेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ गडी गमावत केवळ १२३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ब्रेंडन मॅक्युलमच्या आक्रमक ८१ धावांच्या खेळीमुळे न्यूझीलंडने सहज विजय मिळवला.
मॅक्युलमने केवळ ४६ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ८१ धावांची वादळी खेळी केली होती. या सामन्यात मॅक्युलम सोबत सलामीसाठी आलेल्या मार्टिन गप्टिलने देखील आक्रमक खेळी करत संघाला १० गडी राखून सहज विजय मिळवून दिला होता.
2) टिम सिफर्ट -(८४ धावा विरुद्ध पाकिस्तान )
न्यूझीलंडचा यष्टिरक्षक खेळाडू टीम सिफर्टने पाकिस्तान विरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ८४ धावांची आक्रमक खेळी केली होती. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने न्यूझीलंडला १६४ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात सिफर्टने ६३ चेंडूत नाबाद ८४ धावांची खेळी केली व न्युझीलंड संघाला ९ गडी राखत सामना जिंकून दिला.
१) मोहम्मद रिजवान (८९ धावा विरुद्ध न्युझीलंड)
पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या टी२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवानने ८९ धावांची शानदार खेळी केली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला १७४ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात सलामीसाठी आलेल्या रिजवानने ५९ चेंडूत ८९ धावांची खेळी केली. रिजवानच्या या खेळीमुळे पाकिस्तानने ४ गडी राखून विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘विराट तर गेला, आता पाहू भारतीय संघ कशाप्रकारे उर्जा मिळवणार’
‘अरुण जेटली स्टेडियमच्या स्टँडवरील माझे नाव तात्काळ हटवण्यात यावे’, बिशनसिंग बेदींची धक्कादायक मागणी
ऐकावं ते नवलंच! चक्क प्रखर उन्हामुळे थांबला न्यूझीलंड-पाकिस्तान सामना; चाहत्यांनी उडवली खिल्ली
ट्रेंडिंग लेख –
‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीच्या आयुष्यातील माहीत नसलेल्या ४ गोष्टी
सोळा वर्षे आणि सोळा गोष्टी! जाणून घ्या धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रोमांचक प्रवास
IND v AUS: कसोटी सामन्यांदरम्यान स्टंप माईकमधून ऐकू आलेल्या ३ मजेदार शाब्दिक चकमकी