क्रिकेटच्या कोणत्याही स्वरुपात यष्टीरक्षकाची भूमिका खूप महत्वाची असते. यष्टीरक्षक नेहमी सावध असणे आवश्यक आहे, कारण त्याला एकाच वेळी बर्याच गोष्टी कराव्या लागतात. झेल पकडण्यापासून ते यष्टिचित करण्यापर्यंत यष्टीरक्षकाला नेहमी तयार असावे लागते. जर भारतातील यष्टिरक्षकांबद्दल विचार केला तर एमएस धोनीचे नाव प्रथम घेतले जाते. आयपीएलमध्येही यष्टीमागे सर्वात जास्त शिकार करण्याच्या बाबतीत धोनी अव्वल स्थानी आहे. परंतु हे स्थान तो टिकवून ठेवतो का ते या हंगामात कळेल. कारण अन्य यष्टीरक्षकही आयपीएलमध्ये यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत धोनीपासून फार लांब नाहीत.
या लेखात आयपीएलमधील अशा ३ यष्टीरक्षकांबद्दल सांगू ज्यांनी यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.
३. रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) – ९० विकेट्स
दिग्गज फलंदाज रॉबिन उथप्पा आयपीएलमध्ये यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत तिसर्या क्रमांकावर आहे. पहिल्या हंगामापासूनच उथप्पा आयपीएलचा भाग आहे आणि तेव्हापासून तो सतत खेळत आहे. रॉबिन उथप्पाने आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीत एकूण १७७ सामने खेळले आहेत आणि यातील ११४ डावांमध्ये यष्टीरक्षण करताना त्याने ९० जणांना आपले शिकार बनवले आहे. या दरम्यान उथप्पाने ५८ झेल पकडले आणि ३२ जणांना यष्टीचित केले.
रॉबिन उथप्पा आयपीएल कारकीर्दीत आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, पुणे वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आहे. आता उथप्पा नियमितपणे यष्टीरक्षण करत नाही. तो आवश्यकतेनुसार संघासाठी यष्ठीरक्षण करतो.
२. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) – १३१ विकेट्स
कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक या यादीत दुसर्या क्रमांकावर आहे. पहिल्या सत्रापासून कार्तिक देखील आयपीएलचा एक भाग आहे आणि आतापर्यंत तो आयपीएलमध्ये ६ संघांसाठी खेळला आहे.
दिनेश कार्तिकने आयपीएल कारकीर्दीत आत्तापर्यंत १८२ सामने खेळले असून त्यातील १६६ डावात यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली आहे. यष्टीरक्षण करताना त्याने १३१ शिकार केल्या आहेत. या दरम्यान त्याने १०१ झेल पकडले आणि ३० खेळाडूंना यष्टिचित केले आहे.
१. एमएस धोनी (MS Dhoni) – १३२ विकेट्स
आयपीएलमध्ये यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी पहिल्या स्थानावर आहे. एमएस धोनी हा जगातील एक दिग्गज यष्टीरक्षक आहे आणि यष्टीरक्षक म्हणून त्याने आयपीएलमध्येही उत्तम कामगिरी बजावली आहे.
एमएस धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण १९० सामने खेळले आहेत आणि १८३ डावात त्याने संघासाठी यष्टीरक्षक म्हणून १३२ बळी घेतले आहेत. या दरम्यान त्याने ९४ झेल पकडले आणि ३८ जणांना यष्टीचित केले.
ट्रेंडिंग लेख –
सीपीएल २०२०: ४ परदेशी खेळाडू जे बनू शकतात सीपीएलच्या आठव्या हंगामाचे स्टार
२ वेळा विश्वचषकात संधी मिळूनही दुखापतीमुळे खेळू न शकलेली हरहुन्नरी पुणेकर देविका वैद्य
पुण्याच्या अनाथालयातील पोरगी, जीने ४ वेळा ऑस्ट्रेलियाला केले विश्वविजेते
महत्त्वाच्या बातम्या –
कोरोनानंतर झाला पहिलाच टी२० सामना, ११ पैकी खेळाडूंना १० खेळाडूंना नाही करता आल्या दहा धावा
क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर मॅच खेळणारा आयपीएलमधील एकमेव संघ, कारण होते…
काहीही होऊ द्या! या वर्षापर्यंत धोनीचं राहाणार सीएसकेचा कर्णधार