---Advertisement---

टाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू

On: शुक्रवार, ऑक्टोबर 19, 2018 2:55 PM
---Advertisement---

पुणे | प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामाला सुरुवात होऊन आता १२ दिवस झाले आहे. चेन्नई आणि सोनीपत लेगनंतर आता संघ पुण्यात दाखल झाले आहेत. या लेगमध्ये सर्व संघ मिळुन ११ सामने खेळणार आहेत.

या लेगच्या पहिल्याच सामन्यात गुजरातने पुण्याचा पराभव केला. चेन्नई लेगमध्ये तामिल थलाईवाज संघ ५ पैकी ४ सामन्यात पराभूत झाला तर सोनिपत लेगला ६ पैकी ४ सामन्यातप हरियाणा स्टिलर्सला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे पहिले दोन लेग हे होम टीमसाठी अतिशय खराब ठरले आहेत.

या हंगामात ५० गुण घेणाऱ्या खेळाडूंमध्ये केवळ ३ खेळाडू आहेत. त्यात अजय ठाकूर, नितीन तोमर आणि सिद्धार्थ देसाईचा समावेश आहे.

तमिल थलाईवाजचा कर्णधार असलेल्या अजय ठाकूरने या हंगामात ६ सामन्यात एकूण ६९ गुण घेतले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर पुणेरी पलटनचा नितीन तोमर असून त्याने ५ सामन्यात ६५ गुण घेतले आहे.

तिसऱ्या क्रमांकावर या हंगामात ज्या खेळाडूची सर्वाधिक चर्चा होत आहे तो सिद्धार्थ देसाई आहे. सिद्धार्थने केवळ ४ सामन्यात ५१ गुण घेतले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

–वनडेमध्ये असा पराक्रम करणारा भारत ठरेल पहिलाच संघ

–कपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम?

–एकदा- दोनदा नाही तर चक्क ६व्यांदा करणार विराट हा पराक्रम

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment