आपल्या सर्वांना माहित आहे, की भारतात क्रिकेटच्या खेळाएवढे इतर कोणत्याही खेळाला तितके महत्त्व मिळत नाही. कारण प्रत्येक घरातील आई- वडील आपल्या मुलाला या खेळासाठी प्रेरित करत असतात. त्याचं कारण असं की क्रिकेटमध्ये असलेला पैसा आणि प्रसिद्धी.
भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना प्रचंड पैसे मिळतात तसेच संपूर्ण जगात त्यांची ओळख निर्माण होते. याच कारणास्तव, भारतातील प्रत्येक घरातील मुलाला क्रिकेटपटू बनण्याची इच्छा असते.
असं असलं तरी, आज क्रिकेटपटू कोणत्याही चित्रपटाच्या स्टारपेक्षा कमी नाहीत किंवा असं म्हणा की चित्रपटातील स्टारपेक्षा लोकप्रिय आहेत आणि त्यांच्याकडे पैसेही भरपूर आहेत. आता तुम्ही असा विचार करत असाल, की आज आम्ही क्रिकेटपटूंच्या पैशाच्या मागे का पडलो आहोत?, तर त्याचं कारण असं, की आजच्या या लेखात आपण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह अन्य ४ क्रिकेटपटूंच्या संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांच्याबद्दल जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
आपल्या सर्वांना माहित आहे, की क्रिकेट जगात खेळाडूंची ब्रँड व्हॅल्यू खूप जास्त आहे. त्यांना टीव्ही जाहिरातींसाठी मोठा पैसा मिळतो. कोणत्याही क्रिकेटपटूसाठी पैसे कमविणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. यामुळेच कोणत्याही परिस्थितीत खेळाडू पैसे कमविण्याची संधी सोडत नाहीत. याच कारणास्तव, भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेही बर्याच ब्रँड्सबरोबर करार केला आणि बक्कळ पैसा कमवला आहे. त्याचबरोबर त्यांना खेळाडू म्हणून मिळालेला पगारही वेगळाच आहे.
सर्वांनाच हे जाणून आश्चर्य वाटेल, की जेव्हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंचा विचार केला, तर त्या यादीत पहिल्या १० खेळाडूंपैकी ५ खेळाडू हे भारतीय असून त्यामध्ये सचिन पहिल्या क्रमांकावर आहे.
१. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)
सचिन तेंडुलकरच्या नावे क्रिकेटविश्वात अशा अनेक विक्रमांची नोंद आहे, ज्याची बरोबरी करणं किंवा कोणत्याही खेळाडूंसाठी तो विक्रम मोडणं जवळपास अशक्य आहे. त्याच बरोबर मालमत्तेच्या बाबतीतही सचिनचा कोणीही मुकाबला करू शकत नाही. सचिनची एकूण मालमत्ता ११५ मिलियन डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये तब्बल ८७० कोटी एवढी आहे.
२. एमएस धोनी (MS Dhoni)
सचिननंतर श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत दुसरे नाव आहे भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचे. त्याची एकूण मालमत्ता १११ मिलियन डॉलर इतकी म्हणजेच ८४० कोटी एवढी आहे.
३. विराट कोहली (Virat Kohli)
सचिन आणि धोनीनंतर भारताच्या रन मशीन विराट कोहली याचे नाव येते. कोहलीकडे ९२ मिलियन डॉलर म्हणजेच ६९६ कोटी एवढी संपत्ती आहे. फोर्ब्स २०२० च्या यादीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट एकमेव क्रिकेटपटू आहे. विराटने यावर्षी वेगवेगळ्या ब्रँडच्या जाहिरातींमधून सुमारे १९६ कोटींची कमाई केली असून, विराटची ब्रँड व्हॅल्यू दिवसेंदिवस वाढत आहे.
४. विरेंद्र सेहवागचे (Virender Sehwag)
विराटनंतर या यादीमध्ये भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागचे नाव येते. सेहवागने ज्या प्रकारे मैदान गाजवले आहे, त्याचप्रकारे तो मैदानाबाहेरही उत्तम कामगिरी करतो आहे. सेहवागची एकूण संपत्ती ३०३ कोटी रुपये एवढी आहे.
५. युवराज सिंग (Yuvraj Singh)
सेहवागनंतर षटकारांसाठी प्रसिद्ध असलेला माजी खेळाडू षटकार किंग युवराज सिंगचे नाव येते. युवराजने नेहमीच भारतीय संघात मोलाचे योगदान दिले आहे. युवीकडे एकूण २६५ कोटी रुपयांची संपत्ती आहे.
वाचनीय लेख-
-या ५ खेळाडूंनी मारले आहेत सलग ६ चेंडूत ६ षटकार; दोन भारतीयांचा आहे समावेश
-असे ‘३’ खेळाडू जे घेऊ शकतात बुमराह- भुवनेश्वर- शमी या भारतीय संघाच्या…
-असे ४ साधारण क्रिकेटपटू, जे पुढे जाऊन बनले महान कोच