---Advertisement---

पहिल्याच भेटीत रोहित शर्मा पडला ‘या’ मॉडेलच्या प्रेमात; पहा कोण होती ती मॉडेल

On: रविवार, जुलै 5, 2020 6:35 PM
---Advertisement---

टीव्हीवरील सर्वाधिक चर्चेचा आणि वादग्रस्त शो ‘बिग बॉस’ प्रेक्षकांना खूपच आवडतो. ‘बिग बॉस’ या रिऍलिटी टीव्ही शोची माजी स्पर्धक सोफिया हयात सर्वांनाच नक्कीच आठवत असेल, जिच्याशी भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्माच्या अफेअरच्या बातम्या खूपच चर्चेत होत्या.

हो, हे खरं २०१२ साली रोहित (Rohit Sharma) आणि सोफिया (Sofia Hayat) रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या खूपच चर्चेत आल्या होत्या. या दोघांचे फोटो आणि डेटिंगच्या बातम्या अनेक वर्तमानपत्रांच्या मुख्य बातम्या होत्या. मात्र, त्यांच्या अफेअरची बातमी जितक्या लवकर मीडियाकडे आली, तितक्याच लवकर रोहित आणि सोफियाच्या ब्रेकअपच्या बातम्याही आल्या.

गेल्या वर्षी सोफियाने स्वत: तिच्या आणि रोहितच्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले होते. बातमीनुसार सोफिया एक पुस्तक लिहीत आहे, ज्यात तिच्या आणि रोहितच्या नात्याबद्दलही उल्लेख आहे.

सोफियाने आपल्या एका मुलाखतीत सांगितले, की लंडनमध्ये तिची आणि रोहितची पहिली भेट कशी झाली होती, आणि रोहितने पहिल्याच भेटीत तिला किस केले होते. या मुलाखतीत सोफियाने सांगितले, “रोहित बरोबर माझी पहिली भेट लंडनमधील एका क्लबमध्ये झाली होती. त्या क्लबमध्ये मी माझ्या चित्रपटासाठी रॅप-अप पार्टीसाठी आले होते, तिथे माझ्या एका मित्राने रोहितबरोबर माझी ओळख करून दिली, त्यावेळी मी नाचत होते.”

“मी त्यावेळी रोहितला ओळखत नव्हते, कारण मी क्रिकेट पाहत नव्हते. जेव्हा माझ्या मित्राने माझी ओळख रोहितशी केली, तेव्हा आम्ही दोघे बोलू लागलो आणि बोलता बोलता रोहित आणि मी एका कोपऱ्यात गेलो, तिथे रोहितने अचानक मला किस केले, आणि त्यानंतर आम्ही दोघांनीही डान्स केला,” असेही पुढे सोफिया म्हणाली.

शिवाय सोफियाने हेदेखील सांगितले, की त्या भेटीच्या चार दिवसानंतर रोहित तिच्या घरी राहायला आला होता. त्यानंतर दोघांनीही बराच वेळ एकत्र घालवला. सोफियाने सांगितले की जेव्हा जेव्हा ती भारतात यायची, तेव्हा दोघेही एकतर रोहितच्या घरी किंवा हॉटेलमध्ये वेळ घालवायचे.

याशिवाय या मुलाखतीत सोफियाने रोहितचे कौतुक करताना म्हटले, “तो एक चांगला माणूस आहे. आम्ही दोघांनी एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवला आणि आम्हाला एकमेकांबरोबर खूप चांगलं वाटायचं. परंतु नंतर जेव्हा मीडियाला आमच्या दोघांच्या संबंधांबद्दल कळले, तेव्हा आम्ही भेटणं कमी केले.”

यानंतर सोफिया तिच्या आणि रोहितच्या ब्रेकअपबद्दल बोलताना म्हणाली, “जेव्हा रोहितने एका मुलाखतीत मी त्याच्या चाहत्यांपैकी एक आहे, असे सांगितले तेव्हा मला खूप वाईट वाटलं. त्यानंतर मी त्याच्याबरोबर ब्रेकअप केले होते आणि त्याच्याशी असलेले सर्व संबंध संपविले होते.”

२०१२ ला त्यांच्यात ब्रेकअप झाल्याचाही ट्विट तिने त्यावेळी केला होता. तसेच नंतर तिने त्याला ट्विटरवर ब्लॉक केले असल्याचेही सांगितले होते.

यानंतर रोहितचे २०१५ मध्ये रितिका सजदेहबरोबर कायमचे नाव जोडले. म्हणजेच रोहित आणि रितिकाने (Ritika Sajdeh) लग्न केले. सध्या दोघेही एका मुलीचे पालक आहेत, तर सोफियानेही तिचा प्रियकर व्लाडबरोबर लग्नही केले होते, पण दोघांचे नातं फार काळ टिकू शकले नाही आणि ते दोघेही वेगळे झाले होते. आता सोफिया सिंगल आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-…म्हणून इंग्लंडच्या ‘या’ माजी दिग्गज खेळाडूचे ट्विटर अकाउंट केले ब्लॉक; कारण घ्या जाणून

-असे ४ साधारण क्रिकेटपटू, जे पुढे जाऊन बनले महान कोच

-भारतात टीक टॉक ऍपवर बंदी घातल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने दिली ही प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---