मुंबई | आयपीएल २०१८ आता अंतिम टप्प्यात आली असुन आता साखळी फेरीचे केवळ ४ सामने बाकी राहिले आहेत. ६० सामन्यांपैकी ५६ सामने हे साखळी फेरीचे होणार आहेत.
या स्पर्धेचा शेवटचा सामना २७ मे रोजी मुंबईला खेळवला जाणार आहे. २०१८ची आयपीएल ही खऱ्या अर्थाने गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरली होती. केवळ ५१ सामन्यात यावेळी ७६४ षटकार खेचले गेले आहेत.
यापुर्वी कधीही एवढे जास्त षटकार एकाच हंगामात मारले गेले नाहीत. सरासरी एका सामन्यात ७.०० षटकार या मोसमात मारले गेले आहेत. यापुर्वी कधीही ही सरासरी ६च्या पुढे गेली नाही.
प्रत्येक १६व्या चेंडूवर एक षटकार यावेळी मारला गेला आहे.
२०१२ साली आयपीएलमध्ये १४८ डावात ७३४ षटकार खेचले गेले होते. तर २०१४ला १२० डावात ७१४ षटकार मारले गेले होते.
४ संघांना आतापर्यंत १०० पेक्षा जास्त षटकार मारता आले आहेत. त्यात चेन्नईने १२३ षटकार मारले आहेत तर दिल्लीने १०८, कोलकाताने १०७ आणि बेंगलोरने १०४ षटकारांची बरसात केली आहे.
https://twitter.com/SherryPaaji/status/997726497677889536
महत्त्वाच्या बातम्या-
–धोनी-कोहलीबद्दल झाला आयपीएलमध्ये विलक्षण योगायोग…!!!
–थोडं उशीरा, पण धोनीने केला हा भीमपराक्रम आपल्या नावे!
–त्या फलंदाजाची आयपीएलमधील एक धाव पडली ७ लाख रुपयांना
–रोहित शर्माच्या मुंबईसाठी अशी आहेत प्ले आॅफची समीकरणे!
–एबी डिव्हिलियर्सला कर्नाटक राज्याचं मुख्यमंत्री करा!






