नवी दिल्ली: भारताच्या अविनाश साबळेने नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या ३०००मीटर स्टीपल चेस प्रकारात रौप्य पदक मिळवणारा पहिला बिगर केनियन खेळाडू ठरण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती.
त्यानंतर वेदांता हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या लॉन्चिंग कार्यक्रमात बोलताना साबळे याने सांगितले की, स्पर्धेपूर्वी चार महिने अमेरिकेत प्रशिक्षण घेतल्यामुळे मला पदक जिंकण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. मला कोणत्याही परस्थितीत पदक जिंकायचे होते आणि त्यासाठी मी कसून सराव केला होता. शर्यतीतील ५००मीटर अंतर बाकी असताना मला सुवर्ण पदकाचाही विश्वास वाटत होता. परंतु मला त्यात थोडक्यात अपयश आले. साबळेने अब्राहम किबी व्होट नंतर केवळ ०.०५ सेकंदानी शर्यत पूर्ण करताना रौप्य पदक जिंकले.
साबळेने गेल्यावर्षीच्या दिल्ली हाफ अर्ध मॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवून लांब अंतराच्या शर्यती ही चमकदार कामगिरी केली आहे. ६१मिनिटांच्या आत अर्ध मॅरेथॉन पूर्ण करणारा तो पहिला भारतीय धावपटू ठरला आहे.
यंदाच्या वेदांता दिल्ली हाफ मॅरेथॉनबद्दल बोलताना साबळे म्हणाला की, जागतिक दर्जाच्या धावपटूंशी लढत देण्याची संधी मिळाल्यामुळे भारतीय धावपटुंकरिता ही स्पर्धा म्हणजे सुवर्णसंधीच ठरते. तसेच या स्पर्धेदरम्यान भारतीय प्रेक्षकांकडून आम्हाला प्रचंड पाठिंबा व प्रोत्साहन मिळत. हजारो क्रीडा प्रेमी त्यासाठी दिल्लीतील रस्त्यावर येत असतात.
वेदांता दिल्ली हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या १७व्या सत्राची घोषणा करण्यासाठी दिल्लीत नुकत्याच शानदार लॉन्चिंग समारंभात या स्पर्धेच्या नावनोंदणीलाही प्रारंभ करण्यात आला. यावेळी अंजू बॉबी जॉर्ज, अविनाश साबळे, निखत झरीन, सरदार सिंग, एल्डोज पॉल, शरथ कुमार, विजेंदर सिंग असे दिग्गज आजी माजी खेळाडू उपस्थित होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
थायलंडमध्ये मजा करत असलेल्या शार्दूलला टीम इंडियाकडून आले बोलावणे! ‘या’ दुखापतग्रस्ताची घेणार जागा
आशिया चषकाच्या विजेत्या संघाची भविष्यवाणी; भारतीय दिग्गजच म्हणतोय, ‘पाकिस्तान विजेता..’
‘भारत श्रीलंकेविरुद्ध हरणार आणि आशिया चषकातून बाहेर होणार’, पाकिस्तानी क्रिकेटरचे कटू बोल