मुंबई । न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट प्रकृती अस्वास्थ्यामुळे सावधगिरी बाळगत संघासोबत सरावासाठी मैदानावर आला नाही. वेगवान गोलंदाज टिम साऊदी, ट्रेंट बाउल्ट आणि अनुभवी फलंदाज रॉस टेलरसह न्यूझीलंडचे खेळाडू कोरोना विषाणूच्या नंतर प्रशिक्षणासाठी परतले आहेत.
संघाचे दुसरे सराव सत्र 19 ते 24 जुलै दरम्यान चालेल. दुसर्या प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी बोल्ट मैदानात आला. दुसऱ्या दिवशी तब्येत बरी नसल्यामुळे त्याने मैदानात येणं टाळले.
बोल्ट मैदानावर न येण्याबद्दल रॉस टेलरने विनोद करताना म्हटले की, “मला वाटतं सराव सत्राच्या पहिल्याच दिवशी बोल्टने आठ षटके फेकली होती, ज्यामुळे तो कदाचित थकला असावा. कोरोना विषाणूच्या प्रसारात काळजी घेणे योग्य निर्णय आहे. मला आशा आहे की, तो उद्या मैदानात उतरेल आणि प्रशिक्षणास सुरवात करेल.”
न्यूझीलंडचे पुरुष खेळाडू आठवड्याच्या शेवटी दोन टप्प्यात प्रशिक्षण घेतील, तर महिला खेळाडू सोमवार ते गुरुवारपर्यंत प्रशिक्षण घेतील.