इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल २०२१) दुसऱ्या टप्प्यात पहिला सामना गमावलेल्या मुंबई इंडियन्सचा पुढील सामना गुरुवारी (२३ सप्टेंबर) कोलकाता नाईट रायडर्सशी (केकेआर) होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सकडून मुंबईचा पराभव झाला होता. नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि प्रमुख अष्टपैलू हार्दिक पंड्या त्या सामन्यात मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हते. रोहित आणि हार्दिक पुढील सामन्यात खेळतील की नाही याबाबत चाहत्यांकडून विचारणा केली जात आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने हार्दिक आणि रोहित पुढील सामन्यात खेळणार का? याबाबत महत्त्वाची माहिती दिली.
बोल्टने दिली महत्वपूर्ण माहिती
केकेआर विरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाचा प्रतिनिधी म्हणून वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट पत्रकारांना सामोरा गेला. रोहित आणि हार्दिकच्या संघातील समावेशाविषयी विचारले असता बोल्ट म्हणाला,
” ‘ते (रोहित आणि हार्दिक) दोघेही बरे होत आहेत. पण ते पुढील सामन्यात खेळण्यासाठी उपलब्ध होतील की नाही, मला याबद्दल खात्री नाही. त्यांना विश्रांती देणे हा सावधगिरीचा उपाय होता. हा एक चांगला निर्णय होता जेणेकरून ते पूर्णपणे तंदुरुस्त होतील. जर त्यांनी उद्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन केले तर ते आमच्यासाठी खूप चांगले असेल. मात्र, ते १००% तंदुरुस्त असावे अशी आमची इच्छा आहे.”
रोहित आणि हार्दिकच्या अनुपस्थित मुंबईला चेन्नई विरुद्ध २० धावांनी पराभव पत्करावा लागला होता. सध्या मुंबई आठ सामने खेळून चार विजयांसह चौथ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, केकेआर आठ सामन्यांत तीन विजय मिळवून सहाव्या क्रमांकावर काबीज आहेत.
रोहित आणि हार्दिक न खेळल्यास अशी असेल मुंबईची प्लेइंग इलेव्हन-
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), अनमोलप्रीत सिंग, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, सौरभ तिवारी, कायरन पोलार्ड (कर्णधार), कृणाल पंड्या, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, ऍडम मिल्ने.
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/dc-vs-srh-live-sunrisers-hyderabad-have-won-the-toss-and-have-opted-to-bat/
कार्तिक त्यागीच्या ‘ऐतिहासिक’ षटकामागील ‘ऑस्ट्रेलियन कनेक्शन’
‘युनिवर्स बॉस’ गेलच्या नावावर आहेत आयपीएलचे ‘हे’ ५ मोठे विक्रम, ज्यांना मोडीत काढणे महाकठीण