वनडे क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूने त्रिशतक ठोकणे हे त्याच्यासाठी आणि त्याच्या संघासाठी मोठी गोष्ट आहे. मर्यादित षटकांचा हा खेळ चाहत्यांसाठी पर्वणीचा ठरला आहे. भविष्यात कोणत्या फलंदाजाने त्रिशतक ठोकले तर, त्या फलंदाजासाठी ही अभिमानाची गोष्ट असणार आहे. वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याही खेळाडूने त्रिशतक झळकवले नाही. मात्र, द्विशतक बर्याच फलंदाजांनी लगावले आहे.
असे असले, तरीही मात्र आपण आज या लेखामधून कोणते पाच फलंदाज त्रिशतक ठोकू शकतात, हे जाणून घेणार आहोत.
1. रोहित शर्मा
भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज रोहित याने आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतक लगावले आहेत. तो ही कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू आहे. यामधील त्याची सर्वोच्च धावसंख्या 264 धावांची राहिली आहे. त्याने ही धावसंख्या 2014 साली श्रीलंकेविरुद्ध उभारली होती. हा सामना कोलकाता स्टेडियमवर झाला होता. यादरम्यान त्याने 173 चेंडूचा सामना करताना 33 चौकार आणि 9 षटकार लगावले होते.
रोहितने 2013 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध बेंगलोरमध्ये फलंदाजी करताना 158 चेंडूत 12 चौकार आणि 16 षटकार ठोकून 209 धावांची खेळी होती. त्यामुळे रोहित शर्माकडून त्रिशतक ठोकले जाऊ शकते हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
2. जेसन रॉय
इंग्लंड संघाचा स्फोटक फलंदाज जेसन रॉय हा ज्याप्रकारे वनडेत फलंदाजी करतो. त्याला पाहून अशी अपेक्षा केली जाऊ शकते की, त्याच्याकडून आपल्याला त्रिशतक बघायला मिळू शकते. परंतु आतापर्यंत त्याच्या बॅटमधून एक ही द्विशतक लगावले गेले नाही. मात्र, तो द्विशतकाच्या जवळ पोहचला आहे.
सन 2018 साली त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेत खेळताना 151 चेंडूचा सामना करताना 180 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याचे पहिले द्विशतक थोडक्यात हुकले होते. जेसन रॉयच्या या खेळीमुळे इंग्लंडने हा सामना पाच विकेट्सने जिंकला होता. त्यामुळे हा खेळाडू सुद्धा त्रिशतक ठोकू शकतो. त्यामुळे या कामगिरीसाठी तो दुसरा दावेदार आहे.
3. डेविड वॉर्नर
या यादीमध्ये तिसरे नाव ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज डेविड वॉर्नरचे आहे. त्याची आक्रमक फलंदाजी पाहून असे म्हणता येऊ शकते की, तो मर्यादित षटकांच्या सामन्यात त्रिशतक ठोकू शकतो.
वॉर्नर हा वनडे सामन्यात मोठी खेळी करण्यासाठी ओळखला जातो. त्याने पाकिस्तान विरुद्ध कसोटी सामन्यात एक त्रिशतक सुद्धा लगावले आहे. त्याने 2017 साली पाकिस्तान विरुद्ध वनडे सामना खेळताना 179 धावांची खेळी केली होती. त्यामुळे या फलंदाजांकडून त्रिशतकाची अपेक्षा करणे चुकीचे ठरणार नाही.
4. जाॅनी बेयरस्टो
इंग्लंड संघाचा धुरंधर जाॅनी बेयरस्टो हा सुद्धा या यादीत सहभागी होऊ शकतो. तो मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता राखतो. त्याने या वर्षीच सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध अशी खेळी केली होती. ज्यामुळे त्याचे नाव या यादीत आले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना त्याच्या संघातील खेळाडू एका मागून एक बाद होत होते, तेव्हा जाॅनी बेयरस्टोने संघाला सावरले.
त्याने या सामन्यात आपल्या संघाला 302 धावसंख्येवर पोहचवताना 126 चेंडूचा सामना करताना 12 चौकार आणि 2 षटकार ठोकत 112 धावांची खेळी केली होती. त्यामुळे त्याच्याकडून त्रिशतक ठोकण्याची अपेक्षा केली जाऊ शकते. कारण त्याच्यामधे ती प्रतिभा आहे.
5. मार्टिन गप्टील
न्यूझीलंडचा सलामी फलंदाज मार्टिन गप्टील हा आपल्या दमदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. जगातील दिग्गज खेळाडू त्याच्या कामगिरीने प्रभावित झाले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याने एकदा द्विशतक आणि एकदा 170 पेक्षा जास्त धावांची खेळी केली आहे. 2013 साली त्याने इंग्लंड विरुद्ध खेळताना 155 चेंडूत 189 धावांची खेळी साकारली होती. ज्यामधे त्याने 19 चौकार आणि 2 षटकार लगावले होते.
यांच्याव्यतिरिक्त त्याने दुसर्यांदा 2015 साली विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध फक्त 163 चेंडूत नाबाद 237 धावांची खेळी केली होती. यामध्ये त्याने 24 चौकार 11 षटकार ठोकले होते. त्यामुळे भविष्यात त्याच्याकडून त्रिशतक बघायला मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
‘कोणत्याही परिस्थितीत मला तिथे उपस्थित रहायचे आहे’, पालकत्व रजेवर बोलताना विराटचे वक्तव्य
दिग्गजांच्या मांदियाळीत सामील झाला विराट; केली ‘ही’ अचाट कामगिरी
ऑस्ट्रेलियात मैदान गाजवणारा अष्टपैलू हार्दिक पंड्या घालवतोय पत्नीसोबत वेळ; फोटो व्हायरल