पुणे, 11 ऑक्टोबर 2023: आयटीएफ, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या व आर्यन पंप्स यांनी प्रायोजित केलेल्या एमटी आयटीएफ एस 400(गुण) वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत नितीन किर्तने, सागरिका फडके यांनी तीनही गटात विजेतेपद पटकावत तिहेरी मुकुट संपादन केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 30 वर्षांवरील गटात अंतिम फेरीत प्रसनजीत पॉलने विशाल विष्णूचा 6-0, 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 45 वर्षांवरील गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित नितीन किर्तनेने दुसऱ्या मानांकित यती गुजरातीचा 6-0, 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
महिला एकेरी 35 वर्षांवरील गटात अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित सागरिका फडकेने साफीन शेखचा 6-2, 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 50 वर्षांवरील गटात अंतिम फेरीत पाचव्या मानांकित राजेश गणपतीने सहाव्या मानांकितनवीन अगरवालचा 6-1, 6-2 असा पराभव करून विजेतेपद मिळविले. 45 वर्षांवरील गटात दुहेरीत अंतिम फेरीत मुकुंद जोशी( व नितीन किर्तने यांनी बालकुमार केपी व बलराज केपी यांचा 6-2, 6-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.मिश्र दुहेरी 40 वर्षांवरील गटात अंतिम फेरीत राधिका कानिटकर व आदित्य कानिटकर या जोडीने सोनल फडके व आकाश काळे यांचा 6-0, 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्यांना करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण अर्जून पुरस्कार विजेते गौरव नाटेकर, संदीप कीर्तने, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, डेक्कन जिमखानाचे सरचिटणीस गिरीश इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक रामा राव डोसा, हिमांशु गोसावी, आयटीएफ सुपरवायझर लीना नागेशकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 30 वर्षांवरील गट: अंतिम फेरी:
प्रसनजीत पॉल(भारत)वि.वि.विशाल विष्णू(भारत)6-0, 6-1;
35 वर्षांवरील गट: अंतिम फेरी:
केतन धुमाळ(भारत)(2)वि.वि.रवींद्रनाथ पांडे(भारत)6-2, 6-2;
40 वर्षांवरील गट: उपांत्य फेरी:
आदित्य खन्ना(भारत)[1]वि.वि.स्वरनदीप सिंग दोडी(भारत)[4]6-3, 7-6(5);
मंदार वाकणकर(भारत)[2]वि.वि.संदीप पवार(भारत) [3]4-6, 6-3,(10-5);
45 वर्षांवरील गट: अंतिम फेरी:
नितीन किर्तने(भारत)[1]वि.वि.यती गुजराती(भारत) [2] 6-0, 6-1;
50 वर्षांवरील गट: अंतिम फेरी:
राजेश गणपती(भारत)[5]वि.वि.नवीन अगरवाल (भारत)(6) 6-1, 6-2;
दुहेरी: 45 वर्षांवरील गट: अंतिम फेरी:
मुकुंद जोशी(भारत)/नितीन किर्तने(भारत)[2] वि . वि.बालकुमार केपी(भारत)/बलराज केपी 6-2, 6-0;
महिला एकेरी 35 वर्षांवरील गट: अंतिम फेरी:
सागरिका फडके (भारत)[2]वि.वि. साफीन शेख (भारत) 6-2, 6-1;
मिश्र दुहेरी 40 वर्षांवरील गट: अंतिम फेरी:
राधिका कानिटकर(भारत)/आदित्य कानिटकर(भारत)वि.वि.सोनल फडके(भारत)/आकाश काळे(भारत) 6-0, 6-1;
पुरुष 50 वर्षांवरील गट: अंतिम फेरी:
राजेश गणपति(भारत)/आरव्हीआरके रंगा राव(भारत)वि.वि. ए राजेश नायर(भारत)/विनय रॉय(भारत) 6-1, 6-2;
मिश्र दुहेरी 35 वर्षावरील गट: अंतिम फेरी:
सागरिका फडके/नितीन किर्तने वि.वि.रिंकू कुमारी/स्वरणदीप सिंग धोडी 6-2, 6-3;
महिला दुहेरी: सागरिका फडके/सोनल फाळके वि.वि.
रिंकू कुमारी/गिरीजा येरवडेकर 6-2, 6-1;
महत्वाच्या बातम्या –
पीएमडीटीए मानांकन प्रेसिडेन्सी ज्युनिअर ब्रॉन्झ सिरिज टेनिस 2023 स्पर्धेत समायरा ठाकूर हिला दुहेरी मुकुट
पहिल्या थर्ड आय 14 वर्षाखालील क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश