मुंबई | येथे आज झी महाराष्ट्र कुस्ती दंगल या कुस्ती लीग स्पर्धेतील संघ तसेच खेळाडूंचा लिलाव सुरु आहे. यात ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीला पुणेरी उस्ताद संघाने तब्बल ८ लाख रुपये मोजत आपल्या संघात घेतले आहे.
या संघाची मालकी शांताराम मानवे आणि परितोष पेंटर यांच्याकडे आहे. विजय चौधरी २०१४, २०१५ आणि २०१६ या काळात ट्रिपल महाराष्ट्र केसरी ठरला होता.
सध्या महाराष्ट्र पोलिस दलात विजय पुणे ग्रामीण पोलिसमध्ये डीवायएसपी पदावर आहे. त्याची निवड ८६ किलो वजनी गटात झाली आहे.
लिलावात सध्या विजय चौधरी, राहुल आवारे (पुणेरी उस्ताद ), किरण भगत (वीर मराठवाडा), उत्कर्ष काळे (य़शवंत सातारा) आणि ज्ञानेश्वर जमदाडे (कोल्हापूर मावळे) यांना ८ लाखांची बोली लागली आहे.
#ZMKDPlayersDraft: विजय चौधरी (८६+ किलोग्रॅम वजनगट) #PuneriUstaad संघात ड्राफ्ट. #MaarMusandi pic.twitter.com/QAl71FHeKm
— ZMKD – Zee Maharashtra Kusti Dangal (@MahaKustiDangal) October 19, 2018
आज या लीगमधील ६ संघांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यात अनिभेता स्वप्निल जोशी, अभिनेत्री सई ताम्हनकर आणि दिग्दर्शक नागराज मंजूळेसारख्या मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी संघ विकत घेतले.
२ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर २०१८ या काळात पुण्यातील बालेवाडी येथे ही स्पर्धा पार पडणार आहे. यात यात १२८ खेळाडू ६ संघांकडून खेळताना दिसतील.
या स्पर्धेतील ६ संघ आणि त्यांचे संघमालक-
१. मुंबई अस्त्र- राजेश ढाके
२. पुणेरी उस्ताद- शांताराम मानवे आणि परितोष पेंटर
३. विर मराठवाडा- नागराज मंजूळे
४. विदर्भाचे वाघ- स्वप्निल जोशी
५. कोल्हापूरी मावळे- सई ताम्हनकर
६.यशवंत सातारा- पुरुषोत्तम जाधव
महत्त्वाच्या बातम्या:
-टाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू
–नागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम
–वनडेमध्ये असा पराक्रम करणारा भारत ठरेल पहिलाच संघ
–कपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम?
–एकदा- दोनदा नाही तर चक्क ६व्यांदा करणार विराट हा पराक्रम