---Advertisement---

‘तुला परत मानला रे ठाकूर’, विराट कोहलीचे ‘मुंबईकर’ शार्दुल ठाकूरसाठी खास ट्विट

---Advertisement---

ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ब्रिस्बेन येथील द गॅबा स्टेडियमवर ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना शुक्रवार(१५ जानेवारी) पासून सुरु झाला आहे. या सामन्यात भारताचा पहिला डाव १११.४ षटकांत ३३६ धावांवर संपुष्टात आला आहे. या डावादरम्यान भारताकडून शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने शानदार शतकी भागीदारी केली. त्यामुळे भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीने या दोघांचेही कौतुक केले आहे. विशेष म्हणजे विराटने शार्दुलचे मराठीत कौतुक केले आहे.

भारताने पहिल्या डावात १८६ धावावंरच ६ विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर ७ व्या क्रमांकावर आलेल्या वॉशिंग्टन सुंदर आणि ८ व्या क्रमांकावर आलेल्या शार्दुल ठाकूरने आक्रमक पवित्रा घेत १२३ धावांची भागीदारी करत भारताला सामन्यात पुनरागमन करुन दिले. यावेळी शार्दुलने ११५ चेंडूत ६७ धावा केल्या. या खेळी त्याने ९ चौकार आणि २ षटकार ठोकले. तसेच सुंदरने १४४ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ७ चौकार आणि १ षटकार मारला.

या सामन्यात ऑस्ट्रेलिया १५० पेक्षाही अधिक धावांची आघाडी घेईल असे वाटत असतानाच या दोघांनी केलेल्या शतकी भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाला केवळ नाममात्र ३३ धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे सध्या शार्दुल आणि सुंदरचे कौतुक होत आहे.

त्यांचे कौतुक करताना विराट कोहलीने ट्विट केले आहे की ‘शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरची विश्वासाने भरलेली कामगिरी. हेच काय ते कसोटी क्रिकेट आहे. पदार्पणाच्या सामन्यात वॉशिंग्टनने दाखवलेली शांतता आणि तुला परत मानला रे ठाकूर!’

सुंदरने या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे शार्दुल आणि सुंदर या दोघांशिवाय या डावात कोणत्याच भारतीय फलंदाजाला ५० धावांचा टप्पा पार करता आला नाही. तसेच या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात प्रत्येकी ३ विकेट्ही घेतल्या होत्या.

याआधीही केलंय विराटने शार्दुलचं मराठीत कौतुक 

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात २२ डिसेंबर २०१९ ला वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना बाराबती स्टेडियमवर झाला होता. या सामन्यात भारताने 4 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यावेळी ३१६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जडेजाने ७ व्या विकेटसाठी १५ चेंडूत नाबाद ३० धावांची भागीदारी करत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता. ही भागिदारी करताना शार्दुलने ६ चेंडूत २ चौकार आणि १ षटकारासह नाबाद १७ धावा केल्या होत्या. त्याच्या या छोटेखानी पण तुफानी खेळीचे भारताचा कर्णधार विराट कोहलीने मराठीत कौतुक केले होते.

विराट पालकत्व रजेमुळे भारतात – 

विराटने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यानंतर पालकत्व रजा घेतली होती. त्यामुळे तो डिसेंबर २०२० मध्येच भारतात परतला आहे. त्याला ११ जानेवारी २०२१ ला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. त्यामुळे सध्या त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

गोलंदाजीनंतर फलंदाजीतही शार्दुलचा दे घुमा के! इरफान-अश्विनच्या ‘त्या’ विक्रमाची केली बरोबरी

सुटला असता ना भावा! पहिल्यांदा चेंडू हातून निसटला तरीही स्मिथने पकडला अप्रतिम झेल, बघा व्हिडिओ   

बाबो! मयंकने नॅथन लायनच्या चेंडूवर मारलेला तो षटकार गेला ‘इतका’ लांब, पाहा व्हि़डिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---