भारतीय संघाने चौथ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिज संघाचा सहज पराभव केला. ५९ धावांनी विजय मिळवत टीम इंडियाने मालिका ३-१ अशी जिंकून विजयी आघाडी घेतली. चौथ्या सामन्यात विजय मिळाल्यानंतर भारताने वनडे नंतर आता वेस्ट इंडिज दौऱ्यातील टी-२० मालिकाही खिशात घातली. त्यानंतर सोशल मिडीयावर नेटकऱ्यांनी कर्णधार रोहित शर्माच्या नामाचा जप करण्यास सुरुवात केली आहे. एका चाहत्याने तर थेट रोहित शर्मा सध्या क्रिकेट जगतावर राज्य करत असल्याचे विधान केले आहे.
प्रथम खेळताना भारतीय संघाने १९१ धावांची मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तराच्या डावात खेळताना वेस्ट इंडिजला ही धावसंख्या गाठता आली नाही आणि त्यांचा डाव १३२ धावांवर आटोपला. वेस्ट इंडिजचा संघ फलंदाजीत पूर्णपणे फ्लॉप ठरला. टीम इंडियाच्या मालिका विजयाबद्दल रोहित शर्माचे ट्विटरवर खूप कौतुक करण्यात आले. त्याच्यावर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या.
Rohit Sharma Win % as Captain in T20I is now 82.85. #WIvIND
— Faiz Fazel (@theFaizFazel) August 6, 2022
If Rohit sharma is Lord Ram then Arshdeep is his Hanuman. 🇮🇳🐐
— Un-Lucky (@Luckyytweets) August 6, 2022
https://twitter.com/LeftHandedBeast/status/1555992315906252801
https://twitter.com/Lil_Boies45/status/1555991948296478722
Another easy win for Rohit Sharma with b team, He made it so easy to win a match in past few years, Pahle ke so called captains ne itna hype kar rakha tha jaise bada tough kaam koi.
— Lala (@FabulasGuy) August 6, 2022
https://twitter.com/cricmol/status/1555991787180679170
Rohit Sharma is Here to Rule ! #RohitSharma pic.twitter.com/d28Cm2XldR
— ᴘʀᴀᴛʜᴍᴇsʜ⁴⁵ (@45Fan_Prathmesh) August 6, 2022
https://twitter.com/SportyVishal/status/1555994102126510080
भारताने मालिका जिंकली असली तरी, या मालिकेत सध्या अजून एक सामना बाकी आहे. हा पाचवा आणि शेवटचा सामना रविवारी (७ ऑगस्ट) अमेरिकेतील प्लोरिडा येथे भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता खेळवला जाईल. या सामन्यात भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवला चांगली कामगिरी करत आयसीसी टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान होण्याची संधी आहे. सध्या तो क्रमवारीत केवळ २ अंकांनी पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमच्या पाठी आहे. त्यामुळे या सामन्यात ३०-४० धावांची तुफानी खेळी करत सूर्यकुमार बाबर आझनला टक्कर देऊ शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
CWG BREAKING: ट्रिपल जंपमध्ये ‘पॉल-अब्दुल्ला’ने रचला इतिहास! गोल्ड-सिल्वर भारताच्याच नावे
खुद्द पंतप्रधानांनी ज्याचं कौतुक केलं, तो बीड जिल्ह्याचा अविनाश साबळे आहे तरी कोण?