आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला शुक्रवारी (९ एप्रिल) धडाक्यात सुरुवात झाली. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या पहिल्याच सामन्यात विराट कोहलीचा नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (आरसीबी) गतविजेत्या मुंबई इंडियन्सला दोन गड्यांनी पराभूत करत विजयी सलामी दिली. प्रथमच आरसीबीसाठी खेळणारा ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल या सामन्यात चमकला. त्याचवेळी मॅक्सवेलवरून आरसीबी व त्याचा पूर्वाश्रमीचा संघ पंजाब किंग्स यांच्यात ट्विटर वॉर रंगले.
असे रंगले ट्विटर वॉर
मागील हंगामात पूर्णतः अपयशी ठरल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलला पंजाब संघ व्यवस्थापनाने करारमुक्त केले. त्यानंतर, पार पडलेल्या आयपीएल लिलावात आरसीबीने १४.२५ कोटी रुपयांची मोठी बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.
हंगामातील पहिल्याच सामन्यात मुंबईने दिलेल्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मॅक्सवेलने फटकेबाजी केली. कृणाल पंड्याने टाकलेल्या डावातील दहाव्या षटकात त्याने १०० मीटरचा उत्तुंग षटकार खेचला. त्यावेळी, आरसीबीने ट्विट करत लिहिले,
‘लाल आणि सोनेरी कपड्यांमध्ये मॅक्सवेलचा पहिला षटकार चेन्नईच्या बाहेर गेला. धन्यवाद पंजाब किंग्स’
First Maxi-mum in Red and Gold and he nearly hits it out of Chennai!🤯
Thank you @PunjabKingsIPL. We would hug you if not for social distancing 🤗#PlayBold #WeAreChallengers #MIvRCB #DareToDream
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 9, 2021
त्यावर प्रत्युत्तर देत पंजाब किंग्सने ट्विट केले, ‘ओहह.. गेल, केएल, मनदीप, मयंक आणि सर्फराजसाठी धन्यवाद’
Aww and thank you for Gayle, KL, Mandy, Sarfaraz, Mayank… 🤗#SaddaPunjab #IPL2021 #PunjabKings
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 9, 2021
वरील सर्व खेळाडू हे पूर्वी आरसीबीचा भाग होते. त्यानंतर, पलटवार म्हणून पंजाब किंग्सच्या नव्या जर्सीवरून आरसीबीने त्यांची खिल्ली उडवली. त्यांनी ट्विट केले, ‘तुम्ही जर्सी, लोगो आणि पॅड्स विसरला. आपल्यात कोण हे मोजत राहणार’
You missed jersey, helmet, pads…and logo?
But between us, who's keeping count?🤷♂😉#PlayBold #WeAreChallengers #MIvRCB #DareToDream
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 9, 2021
पंजाब किंग्स संघाची नवी जर्सी ही आरसीबीच्या मागील काही जुन्या जर्सीशी मिळतीजुळती आहे. यापूर्वी देखील चाहत्यांनी पंजाब किंग्सला ‘आरसीबी लाईट’ म्हटले होते.
Yes, thank you for inventing colours 😊
And congrats on the win 👏🏻#SaddaPunjab #PunjabKings #IPL2021 #MIvRCB— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 9, 2021
मॅक्सवेलची तुफानी खेळी
पहिले दोन गडी लवकर बाद झाल्यानंतर पहिल्यांदाच आरसीबीसाठी मैदानात उतरलेल्या ग्लेन मॅक्सवेलने आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्याने तीन चौकार व दोन षटकारांच्या सहाय्याने २८ चेंडूत ३९ धावांची खेळी केली. मॅक्सवेलने २०१८ आयपीएल नंतर प्रथमच आयपीएलमध्ये षटकार ठोकला आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘तुम्ही पहिले मास्क घालून या’, चाहत्यांचा सोशल मीडियावर सौरव गांगुली-जय शहांना दणका
IPL 2021: ‘त्या’ तीन चुका, ज्यामुळे रोहितची पलटण आरसीबीच्या हातून झाली चारीमुंड्या चीत!