---Advertisement---

विराटच्या १०० व्या कसोटीनिमित्त अनुष्काने मैदानात उतरणे योग्य की अयोग्य? चाहत्यांमध्ये रंगले ट्वीटरवॉर 

On: शनिवार, मार्च 5, 2022 1:32 PM
Virat-Kohli-and-Anushka-Sharma
---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने (Virat Kohli) शुक्रवारी (४ मार्च) मोठी कामगिरी केली आहे. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना खेळणारा तो १२ वा खेळाडू ठरला आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याला विशेष कॅप देऊन सन्मान केला. कोहलीच्या या सन्मान सोहळ्यात पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) देखील मैदानात उपस्थित होती. विशेष कॅप मिळाल्यानंतर कोहलीने अनुष्काला मिठी मारली आणि आपला आनंद तिच्यासोबत शेअर केला. परंतु अनुष्काने अशा प्रकारे मैदानात उतरणे चाहत्यांना आवडले नाही.

भारत आणि श्रीलंका संघांमधील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना ४ मार्चपासून मोहालीत खेळवला जात आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची ही १०० वी कसोटी आहे. या सामन्यात नाणेफेक भारताने जिंकले आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर १५ मिनिटांनी कोहलीला मैदानात सन्मानित करण्यात आले. यावेळी पत्नी अनुष्का देखील मैदानात उपस्थित होती. आता अनुष्काने मैदानात उतरणे योग्य की अयोग्य यावर मैदानात वाद सुरु झाले आहेत. यावर चाहत्यांच्या दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

टीका करणाऱ्या चाहत्यांमधील एकाने विचारले की, ‘अनुष्का शर्मा मैदानावर बाकीच्या खेळाडूंसोबत काय करत आहे?’ दुसर्‍या यूजरने लिहले आहे की, ‘मी अनुष्का येथे का आहे हे विचारत नाही, परंतु मला हे विचारायचे आहे की अनुष्का मैदानात का आहे? जवळपास सर्वच कुटुंबातील सदस्य आपल्या खेळाडूंच्या सन्मान सोहळ्याला पोहोचतात, परंतु सामना सुरु होण्यापूर्वी ते मैदानात जात नाहीत. अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.’

तसेच काही चाहत्यांनी अनुष्काच्या या कृत्यावर चांगल्या प्रतिक्रियासुद्धा दिल्या आहेत. एका चाहत्याने इशांत शर्माचे उदाहरण देत हे योग्य असल्याचे सांगितले आहे. इशांतने गतवर्षी आपले १०० कसोटी पुर्ण केल्या होत्या. तेव्हा तो आपल्या पत्नीसह मैदानात उतरला होता. हे उदाहरण देत लोकांनी अनुष्काला प्रोत्साहान दिले आहे.

https://twitter.com/AjEeTj_20/status/1499618830137528320

https://twitter.com/LQwer15/status/1499601129423839242

https://twitter.com/Kohli4ever/status/1499593424093155332

विराट १०० कसोटी सामने खेळणारा भारताचा १२ वा खेळाडू आहे, तर जगातील एकूण ७१ वा खेळाडू आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

मोहाली कसोटी : रविंद्र जडेजाचे शानदार शतक, रचले विक्रमांचे मनोरे; हटके सेलिब्रेशन चर्चेत

PAK vs AUS: पहिल्या कसोटीच्या खेळपट्टीचा फोटो पाहून युझर्सनी केली थेट रस्त्याशी तुलना, पाहा मीम्स

रिषभ ९६ धावांवर बाद होताच गावसकर, धोनी यांच्या ‘या’ विक्रमांशी झाली बरोबरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---