बुधवारी (८ सप्टेंबर) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेसाठी १५ सदस्ययी भारतीय संघाची घोषणा केली. याबरोबरच आणखी एक घोषणा बीसीसीआयने केली, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ती घोषणा म्हणजे भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघासह मार्गदर्शक (मेंटॉर) म्हणून जाणार आहे.
धोनी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार समजला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ सालचा टी२० विश्वचषक, २०११ चा वनडे विश्वचषक आणि २०१३ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. त्याने गेल्यावर्षी १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तसेच तो २०१९ विश्वचषकात अखेरचा भारतीय संघाकडून खेळला होता.
त्यामुळे २०१९ नंतर चाहत्यांनी धोनीला भारतीय संघासह पाहिले नव्हते, मात्र आता टी२० विश्वचषकात पुन्हा एकदा धोनी भारतीय संघासह दिसणार आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.
धोनीबद्दल माहिती देताना बीसीसीआयने ट्विट केले आहे की ‘भारताचा माजी कर्णधार धोनी टी२० विश्वचषकादरम्यान मार्गदर्शक (मेंटॉर) म्हणून भारतीय संघाबरोबर असणार आहे. याबरोबर धोनी आणि विराट कोहलीचा एक फोटो बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला असून त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. विराट आणि धोनी या भारताच्या आजी-माजी कर्णधारांमध्ये चांगली मैत्री आहे.
धोनी भारताचा मेंटॉर बनल्याबद्दल भारताचा माजी क्रिकेटपटू वासीम जाफरने रजनीकांतचे प्रसिद्ध मीम शेअर केले आहे. ज्यावर लिहिले आहे की ‘क्यू हिला डाला ना’. तसेच या मीमला जाफरने कॅप्शन दिले आहे की ‘धोनी जेव्हा टी२० विश्वचषक २०२१ साठी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये सरप्राईज एन्ट्री घेईल तेव्हा.”
तसेच आयपीएलमध्ये धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्सने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. याशिवाय देखील अनेक चाहत्यांनी ‘वाथी कमिंग’ असे कॅप्शन देत फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्या आहेत. तर काहींनी विविध प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
https://twitter.com/BCCI/status/1435648113075646466
MS Dhoni after making a surprise entry into the Indian dressing room for #t20worldcup2021 ???? pic.twitter.com/xhJtxqes7m
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) September 8, 2021
Thala Parambara ????#NeeyeO7I #T20WorldCup #WhistlePodu ???? @msdhoni pic.twitter.com/uCg6Vii09P
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 8, 2021
This bonding❤️ pic.twitter.com/XmjpErA0Yw
— Mr.N1️⃣8️⃣ (@FanBoyOfAA1) September 8, 2021
https://twitter.com/Yadavjiabhishe1/status/1435648326766981120
#MSDhoni now trending at 4th WORLDWIDE ????
The game's most celebrated ICON is back ????#MentorDhoni | @msdhoni ❤️ pic.twitter.com/9Id7lJwyiE
— DHONI Trends™ (@TrendsDhoni) September 8, 2021
MSD 2️⃣.0️⃣ ????
The inaugural #T20WorldCup winning captain is ???? with #TeamIndia, but this time as a mentor! ????#SaddaPunjab #PunjabKings #MSDhoni @msdhoni pic.twitter.com/aWWpdrsQIb
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) September 8, 2021
Every MSDian right now ????❤#MSDhoni | #MentorDhoni | @MSDhoni pic.twitter.com/dZyMwjDEbH
— Dhoni Army TN™ (@DhoniArmyTN) September 8, 2021
https://twitter.com/DhoniArmyTN/status/1435640708073857025
https://twitter.com/SJ_offl_/status/1435636721677266948
https://twitter.com/smileandraja/status/1435632172686249985
https://twitter.com/MSDhoniRules/status/1435635191821840387
https://twitter.com/TrendsDhoni/status/1435649091032076298
Msd forever ????????????????????
Fanbase ???? #TeamIndia #MsDhoni pic.twitter.com/65pwrVE8bF
— . (@HancocK_Vj) September 8, 2021
https://twitter.com/QuickestStump/status/1435654498014269442
https://twitter.com/Shankardada55/status/1435643322945585152
Vaathi coming otheyyy ????????#MSDhoni | @MSDhoni | #Dhoni pic.twitter.com/p6Lre5Z0kJ
— CSK Fans Army™ (@CSKFansArmy) September 8, 2021
https://twitter.com/DhoniArmyTN/status/1435640708073857025
MS Dhoni is Mentor of India's T20 World Cup Squad. Vaathi coming????#MSDhoni #TeamIndia #t20worldcup2021 pic.twitter.com/V3TsJ7s4AQ
— VARMA???????? (@vinod_csk) September 8, 2021
असा आहे टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह , भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू – श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दिपक चाहर
महत्त्वाच्या बातम्या –
उन्मुक्त चंदने गाजवली अमेरिका! १० षटकार आणि ३० चौकारांच्या मदतीने ठोकल्या ३०४ धावा
सुरेश रैनाने धोनीच्या मैदानातील आवडत्या डायलॉग विषयी केला खुलासा, म्हणाला…
हिटमॅनचा कहर! सलग ७ व्यांदा रोहित शर्मा टी२० विश्वचषकात खेळणार, पाहा आजपर्यंतचे सर्व भारतीय संघ






