---Advertisement---

टी२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार असल्याचे कळताच ‘मौका मौका’ ट्रेंड, पाहा काही खास मीम्स

---Advertisement---

शुक्रवारी (१६ जुलै) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेसाठी गटवारी जाहीर केली आहे. या गटवारीनुसार या टी२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ सुपर १२ च्या फेरीत आमने-सामने येणार आहेत. कारण दोन्ही संघांचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

चाहत्यांकडून मीम्स व्हायरल
टी२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा आमने-सामने येणार असल्याचे कळताच चाहत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला आहे. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया देताना मीम्सही शेअर केले आहेत. तसेच ‘मौका मौका’ हे वाक्यही ट्रेंट होऊ लागले आहे.

टी२० विश्वचषकात सहाव्यांदा भारत-पाकिस्तान आमने-सामने 
आत्तापर्यंत २००७ पासून ६ वेळा टी२० विश्वचषक आयोजित करण्यात आला आहे. यंदाचा सातवा टी२० विश्वचषक असणार आहे. तसेच या टी२० विश्वचषकात एकूण सहाव्यांदा भारत आणि पाकिस्तान आमने-सामने असणार आहेत. यापूर्वी टी२० विश्वचषकात सर्वात आधी भारत आणि पाकिस्तान संघ २००७ साली आमने-सामने आले होते. त्यावेळी साखळी फेरीत आणि अंतिम सामन्यात हे दोन संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते.

त्यानंतर २०१२ सालच्या टी२० विश्वचषकात सुपर आठच्या फेरीत या दोन संघात सामना झाला होता. यानंतर २०१४ आणि २०१६ सालच्या टी२० विश्वचषकात साखळी फेरीदरम्यान भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांविरुद्ध खेळले होते. या दोन संघात २००९ आणि २०१० च्या टी२० विश्वचषकात मात्र, कोणताही आमना-सामना झाला नव्हता.

पाकिस्तानविरुद्ध भारत अपराजित
भारत आणि पाकिस्तान यांच्यात २०१६ पर्यंत ५ वेळा टी२० विश्वचषकात सामना झाला आहे. त्यातील ४ वेळा भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तर एक सामना बरोबरीत सुटला होता, जो २००७ च्या टी२० विश्वचषकात झाला होता. पण हा बरोबरीत सुटलेल्या सामन्याचा निकाल बॉल-आऊटमध्ये लागला होता. ज्यात भारताने बाजी मारली होती.

https://twitter.com/junior_Ram__04/status/1416009550725976066

https://twitter.com/Bloody_humorous/status/1415976799582834690

टी२० विश्वचषक २०२१ साठी अशी आहे गटवारी 
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यावर्षी १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान टी२० विश्वचषकाचे आयोजन ओमान आणि संयुक्त अरब अमिराती येथे करणार आहे. हा विश्वचषक भारतात होणार होता, पण कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता ही स्पर्धा ओमान आणि युएईमध्ये हलवण्यात आली.

या टी२० विश्वचकासाठी संघांची गट विभागणी २० मार्च २०२१ पर्यंतच्या संघ क्रमवारीनुसार करण्यात आली आहे. या विश्वचषकात क्रमवारीत अव्वल ८ स्थानांवर असलेले संघ थेट सुपर १२ च्या फेरीत खेळतील. तर अन्य ८ संघांमध्ये पहिली फेरी पार पडेल. त्यातील ४ संघ (प्रत्येक गटातील अव्वल २ संघ) सुपर १२ फेरीसाठी पात्र ठरतील. या फेरीत १२ संघांची २ गटात विभागणी होईल. म्हणजे प्रत्येक गटात ६ संघ असतील.

आयसीसीने जाहीर केलेल्या गटवारीनुसार सुपर १२ फेरीसाठी गतविजेते वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा पहिल्या गटात समावेश आहे. या गटात पहिल्या फेरीतून पात्र ठरणारे २ संघ सामील होतील. तसेच सुपर १२ फेरीच्या दुसऱ्या गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. तसेच या गटातही पहिल्या फेरीतून पात्र ठरणारे २ संघ सामील होतील.

पहिल्या फेरीत ८ संघांमध्ये बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलंड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी या देशांचा समावेश आहे. त्यांचीही २ गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात श्रीलंका, आयर्लंड, नामीबिया आणि नेदरलंड्स यांचा समावेश आहे. तर ब गटात ओमान, बांगलादेश, स्कॉटलंड आणि पापुआ न्यू गिनी या संघांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘खरचं.. भारतीय संघाचा हेवा वाटतो, त्यांच्याकडे असे खेळाडू आहेत,’ विरोधी संघातून कौतुकाचा वर्षाव

प्यार का कोई धर्म नही होता! दुसऱ्या धर्मातील मुलीशी लग्न करणारे ‘हे’ आहेत भारतीय क्रिकेटर

तीन आठवड्यांच्या सुटीनंतर टीम इंडिया जोमात; इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी असा सुरू झाला सराव, व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---