‘मूर्ती लहान, पण कीर्ती महान’ असे म्हणण्याजोगी कामगिरी राजस्थान रॉयल्स संघाचा युवा फलंदाज यशस्वी जयसवाल याने गुरुवारी (दि. 11 मे) करून दाखवली. जयसवालने कोलकाता नाईट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स संघात पार पडलेल्या आयपीएल 2023च्या 56व्या सामन्यात नाबाद 98 धावा ठोकत संघाला 9 विकेट्सने विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे, त्याआधी जयसवालने 13 चेंडूत अर्धशतक ठोकत वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रमही मोडीत काढला होता. आता जयसवालवर फलंदाजीसाठी त्याचे चोहोबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे.
यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याने ईडन गार्डन्स मैदानावरील या सामन्यात उच्च दर्जाच्या फलंदाजीचा नजारा दाखवला. जयसवालने या सामन्यात फक्त 47 चेंडूंचा सामना केला. यादरम्यान त्याने सर्वाधिक नाबाद 98 धावा केल्या. या धावा करताना त्याने 5 षटकार आणि 13 चौकारांचा पाऊस पाडला. यावेळी जयसवालने तब्बल 208.51च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली.
ट्विटरवर प्रतिक्रिया
जयसवालची फलंदाजी पाहून अनेक आजी-माजी विस्फोटक खेळाडूंनी ट्विटरवर प्रतिक्रिया (Twitter Reactions) व्यक्त केल्या. भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने तोंडभरून कौतुक केले. त्याने ट्वीटमध्ये जयसवालला टॅग करत लिहिले की, “खास खेळी, खास खेळाडू.”
Special knock. Special player.
Take a bow @ybj_19 🔥— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) May 11, 2023
याव्यतिरिक्त माजी दिग्गज खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) यानेही ट्वीट करत लिहिले की, “वेगवान अर्धशतकाबद्दल अभिनंदन यशस्वी जयसवाल. तुझ्या मेहनतीचे फळ मिळाले. तसेच, तुझे अपवादात्मक कौशल्य तुला खूप पुढे घेऊन जातील. अशीच कामगिरी करत राहा.”
Congratulations @ybj_19 on the fastest IPL fifty. Your hard work paid off, and your exceptional skills will take you far. Keep it up! #IPL2023 #KKRvRR
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) May 11, 2023
रैनाव्यतिरिक्त समालोचक आणि वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू इयान बिशप हेदेखील जयसवालचे चाहते बनले. त्यांनी ट्वीट करत लिहिले की, “यशस्वी जयसवालचे इतर दोन क्रिकेटमधील आकडेही उत्कृष्ट आहेत, हे आणखी एकदा नमूद करणे योग्य आहे. एक चांगला क्रॉस फॉरमॅट खेळाडू.”
It’s worth pointing out one more time that Yashasvi Jaiswal’s numbers in the other two formats is also outstanding. A good cross format player.
— Ian Raphael Bishop (@irbishi) May 11, 2023
इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनी जयसवालचे कौतुक केले आणि केएल राहुलवर निशाणा साधला. ते ट्वीट करत म्हणाले की, “मी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केएल राहुलच्या जागी यशस्वी जयसवालला निवडले असते. तो खूप चांगला आहे. तो भारताचा सुपरस्टार होणार आहे.”
I would have selected @ybj_19 as KL Rahuls replacement for the World Test championship final … He is that good .. he is going to be a superstar .. #India
— Michael Vaughan (@MichaelVaughan) May 11, 2023
सामन्याविषयी थोडक्यात
या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 विकेट्स गमावत 149 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने यशस्वी जयसवाल (नाबाद 98) आणि संजू सॅमसन (नाबाद 48) यांच्या फलंदाजीच्या जोरावर 13.1 षटकात 151 धावा केल्या. तसेच, सामना 9 विकेट्सने खिशात घातला. या विजयासह राजस्थान गुणतालिकेत 12 गुणांसह तिसऱ्या स्थानी विराजमान झाला. (Twitter reaction after yashasvi jaiswal batting suresh raina suryakumar yadav ian bishop tweet)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
याला म्हणतात चित्त्याची चपळाई! बाऊंड्री लाईनवर धावत हेटमायरने पकडला अचंबित करणारा कॅच, व्हिडिओ पाहाच
ब्रेकिंग! चहलने रचला इतिहास, ब्रावोच्या विक्रमाला धक्का देत बनला IPLमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा बॉलर