ऑस्ट्रेलियाने टी२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत गुरुवारी (११ नोव्हेंबर)पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला आणि दुसऱ्यांदा टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ४ बाद १७६ धावा केल्या. यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने एक षटक शिल्लक असताना पाच गडी गमावून लक्ष्य गाठले.
मॅथ्यू वेडने (४१*) वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने टाकलेल्या १९ व्या षटकातील अखेरच्या तीन चेंडूवर लागोपाठ ३ षटकार खेचून ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्याचे तिकीट मिळवून दिले. या दमदार खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. वेडने १७ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकार ठोकले. मार्कस स्टॉयनिसने ३१ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह सलग ४० धावा केल्या. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ८१ धावांची नाबाद भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाच्या दमदार विजयानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने ट्विट करत, ‘अविश्वसनीय’ असे म्हटले आहे. भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणने म्हटले की, ‘पाकिस्तान संघाने चांगला प्रयत्न केला पण ऑस्ट्रेलिया संघ वरचढ ठरला, वेलडन ऑस्ट्रेलिया.’
Unbelievable
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) November 11, 2021
Well tried #pak cricket! You were really good until today but Australia were better. Well done Aussie????
— Irfan Pathan (@IrfanPathan) November 11, 2021
तसेच सचिन तेंडुलकरने म्हटले आहे की, ‘काय शानदार सामना होता. पाकिस्तानने चांगला सामना खेळला. पण ऑस्ट्रेलियाने अखेरच्या ५ षटकांत चांगले पुनरागमन करत सामना संपला. मार्कस स्टॉयनिसने त्यांना (ऑस्ट्रेलिया) सामन्यात परत आणले आणि मॅथ्यू वेडने संधीचा फायदा घेत ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत नेले.’
What a game of cricket! ????#Pakistan played some good cricket but #Australia came back hard in the last 5 overs of the match and finished the game strong. ???????? @MStoinis got them back into contention & @MatthewWade13 capitalized on the chance to take Australia through.#PAKvAUS pic.twitter.com/hMfIOfmD3r
— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 11, 2021
वेस्टइंडिजचा माजी खेळाडू डेरेम सॅमीने म्हटले आहे की, ‘या विश्वचषक स्पर्धेत नवीन विजेता मिळणार आहे. पाकिस्तान संघाने स्पर्धेत आपला एकमेव सामना चुकीच्या वेळी गमावला आहे.’
There will definitely be a new @T20WorldCup champion this year. Two amazing semi finals. Pakistan lose their only game in the tournament at the wrong time.. the cup is going down under for sure.
— Daren Sammy (@darensammy88) November 11, 2021
हरभजन सिंगने म्हटले आहे की, ‘वा, वा ऑस्ट्रेलिया, उत्कृष्ट फलंदाजी मॅथ्यू वेड.’
Aussie Aussie Aussie oye oye oye What a win … class top class batting #wade .. @T20WorldCup #PAKVSAUS
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) November 11, 2021
Australia reaching another WC final #AUSvPAK #T20WorldCup pic.twitter.com/OhtpSBBd4i
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) November 11, 2021
Waddeeyyyyyy!! ???????????????? #PAKVSAUS
— Peter Siddle (@petersiddle403) November 11, 2021
Twice in two days we have thought the bowling side had it covered. Twice it has ended with an over left. There is no limit to what these hitters can get now.
— Harsha Bhogle (@bhogleharsha) November 11, 2021
Well played @CricketAus hard luck to our boys u guys give everything in the whole tournament proud of u guys????
— Mohammad Amir (@iamamirofficial) November 11, 2021
Did Hasan Ali drop the World Cup ?#PAKvAUS #T20WorldCup
— S.Badrinath (@s_badrinath) November 11, 2021
Stunning fight back from Australia! Wade is not bad after all! #Pakistan #PAKVSAUS #AUSvPAK
— R P Singh रुद्र प्रताप सिंह (@rpsingh) November 11, 2021
No Yorkers at the death cost both England and Pakistan… congrats @CricketAus ✅ to the finals we go #T20WorldCup #T20WorldCupsquad
— Herschelle Gibbs (@hershybru) November 11, 2021
WOW
— Carlos Brathwaite (@CRBrathwaite26) November 11, 2021
Wow just wow! #PAKVSAUS #T20Worldcup
— Mitchell McClenaghan (@Mitch_Savage) November 11, 2021
We witnessed some outstanding cricket back to back in the #semifinals under pressure. Congratulations #Australia. #Pakistan you can be proud of your campaign so far! #T20WorldCup
— Pragyan Ojha (@pragyanojha) November 11, 2021
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. बाबरला ३९ धावांवर ऍडम झाम्पाने झेलबाद केले. त्याने ३४ चेंडूत ५ चौकार मारले.
यानंतर रिझवानने फखर जमानसोबत डाव पुढे नेत दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. रिझवानने ६७ धावा केल्या. तो मिशेल स्टार्कच्या चेंडूवर झेलबाद झाला. फखर जमानने नाबाद ५५ धावा केल्या. पाकिस्तानने २० षटकात ४ गडी गमावून १७६ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
सेम टू सेम! टी२० विश्वचषकाच्या दोन्ही उपांत्य सामन्यांत होते ‘हे’ साम्य
अरेरे! ऑस्ट्रेलिया जिंकले, पण कर्णधार ऍरॉन फिंचच्या नावावर झाला ‘हा’ नकोसा विक्रम
पहिलाच टी२० विश्वचषक बाबर आझमसाठी खास! विराट, हेडन सारख्या दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान






