---Advertisement---

दिप्ती शर्माच्या धावबाद प्रकरणामुळे पेटले ‘ट्वीटर वॉर’, हर्षा भोगलेंच्या ट्वीटला बेन स्टोक्सकडून प्रत्युत्तर

_Ben Stokes harsha bhogle
---Advertisement---

मागच्या महिन्यात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय महिला संघाने चमकदार कामगिरी केली. यजमान इंग्लंडला त्यांच्याच मायदेशात क्लीन स्वीप देण्यासाठी दिप्ती शर्मा हिने घेतलेली शेवटची विकेट निर्णायक ठरली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दिप्ती शर्माने नॉन स्ट्राईक एंडवर चार्ली जीन हिला धावबाद (मांकडींग) केले. याच पाश्वभूमीवर इंग्लंडच्या अनेक क्रिकेटपटूंनी याबाबत नराजी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर समालोचक हर्षा भोगले यांनी इंग्लिश खेळाडूंवर टीका केली. आता इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सकडूनही यावर प्रत्युत्तर मिळाले आहे. 

शुक्रवारी (30 सप्टेंबर) हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी ट्वीटवर मोठी पोस्ट लिहिली. त्यांनी या पोस्टमध्ये इंग्लिश खेळाडूंचे विचार आणि त्याचसोबत त्यांच्या संस्कृतीवर देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांची ही पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. अशाताच इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) याने भोगलेंना प्रत्युत्तर दिले आहे. स्टोक्सने लिहिले की, “हर्षा मांकडींगवर लोकांनी मांडलेल्या प्रतिक्रियांवर तुम्ही संस्कृतीला मध्ये घेऊन येत आहात.”

स्टोक्सने यावेळी 2019 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याविषयी देखील लिहिले. त्याने ट्वीट केले की, “हर्षा 2019 विश्वचषकाला दोन वर्ष झाली. मला आजही मला आजही याविषयी भारतीय चाहत्यांचे मेसेज येतात. या गोष्टी तुम्हाला त्रात देतात का?”

 

2019 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात जे घडले, त्याच्याशी हर्षा भोगले देखील सहमत असल्याचे दिसले. त्यांनी स्टोक्सला उत्तर देत लिहिले की, “असो, तेव्हा तुमची काहीच चूक नव्हती, त्यामुळे मी तुमच्या सोबत आहे. नॉन स्ट्राईकरच्या बॅकअपसाठी इंग्लंडमधून येणाऱ्या प्रतिक्रियांविषयी मला वाटते, जेव्हा तुम्ही खेळ शिकता आणि संस्कृतीचा भाग अशता, तेव्हा तुम्हाला हेच सांगितले जाते. जर तुझ्याकडे वेळ असेल, तर एक दिवस याविषयी बोलायला आवडेल.”

दरम्यान, दिप्ती शर्मावर होत असलेल्या टीकांवर हर्षा भोगले या ट्वीटमध्ये व्यक्त झाले होते. त्यांनी एकापाठोपाठ एक असे काही ट्वीट करून स्वतःचे मत स्पष्टपणे मांडले होते. त्यांच्या मते क्रिकेटची सुरुवात ज्याठिकाणी झाली तो इंग्लंड त्यांचे विचार इतरांवर लादण्याचा प्रयत्न करत आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बेबी फुटबॉल लीगमध्ये मेट्रो सिटी विजेते
पत्रकारांना तोंड देण्याची वेळ माझ्यावर का? पाकिस्तान संघ व्यवस्थापनावर गोलंदाजी प्रशिक्षक नाराज 
फुटबॉल वर्ल्डकपच्या बक्षिस रकमेपुढे टी20 वर्ल्डकप रक्कम म्हणजे चिल्लर! पाहा डोळे फिरवणारे आकडे   

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---