पुणे: पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या अभिनव उपक्रमातील ८ वर्षांखालील स्पर्धेत मेट्रो सिटी फुटबॉल अकादमीने विजेतेपद मिळविले. अंतिम फेरीच्या लढतीत त्यांनी बार्का अकादमीचा टायब्रेकमध्ये ११-० असा पराभव केला.
नियोजित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत राहिला होता. आयन सोनिग्राने तिसऱ्या आणि अहान मुखर्जीने १५व्या मिनिटाला गोल करून दोनदा बार्का अकादमीला आघाडीवर नेले होते. मात्र, त्याचा त्यांना फायदा उठवता आला नाही. सिद्धी देशमुखने ७व्या मिनिटाला गोल करून प्रथम मेट्रो संघाला बरोबरीवर नेले. त्यानंतर २४व्या मिनिटाला दिविज पाटणकरने मेट्रो संघाला पुन्हा बरोबरी मिळवून दिली होती. बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये मेट्रो सिटी फुटबॉल अकादमीने विजय मिळविला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पत्रकारांना तोंड देण्याची वेळ माझ्यावर का? पाकिस्तान संघ व्यवस्थापनावर गोलंदाजी प्रशिक्षक नाराज
बुमराहच्या वर्ल्डकप खेळण्याविषयी द्रविड यांनी दिले सर्वात महत्त्वाचे अपडेट; वाचा काय म्हणाले






