---Advertisement---

BANvsIND | वनडे मालिकेपूर्वी बांगलादेशला मोठे झटके, कर्णधार आणि ‘हा’ घातक गोलंदाज संघातून बाहेर!

On: गुरूवार, डिसेंबर 1, 2022 11:42 PM
Tamim Iqbal
---Advertisement---

न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघाने टी-20 मालिका जिंकली, पण एकदिवसीय मालिकेत संघाला पराभव स्वीकारावा लागला. हा दौरा बुधवारी (30 नोव्हेंबर) संपला. आता भारतीय संघाचा पुढचा दौरा बांगलादेश असेल. याठिकाणी संघाला तीन सामन्यांची एकदिवसीय आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. उभय संघांतील एकदिवसीय मालिका 4 डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. पण त्याआधी बांगलादेश संघाला दोन मोठे झटके मिळाले आहेत. 

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना मिरपूरमध्ये 4 डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी बांगलादेश संघासाठी दोन वाईट बातम्या समोर आल्या आहेत. पहिली वाईट बातमी म्हणजे त्यांचा कर्णधार तमीम इकबाल (Tamim Iqbal) या एकदिवसीय मालिकेतून बाहेर झाला आहे. तर दुसरी वाईट बातमी गोलंदाजी विभागातून आहेत. बांगलादेशचा फिरकी गोलंदाज तस्कीन अहमद (Taskeen Ahmed) दुखारतीच्या कारणास्तव मालिकेतील पहिला सामना न खेळण्याची शक्यता आहे.  माध्यमांतील वृत्तांनुसार तमीम 30 नोव्हेंबर रोजी शेर-ए-बांगला स्टेडियमवर सराव करत होता. याच वेळी त्याला दुखापत झाली.

ग्रोईन इंजरीमुळे तो आता भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळू शकणार नाहीये. तसेच कसोटी मालिकेत देखील त्याच्या खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्याच्या अनुपस्थितीत बांगलादेश संघाचे नेतृत्व कोण करणार, हे अद्याप ठरू शकले नाहीये.  दुसरीकडे त्यांचा फरीक गोलंदाज तस्कीन अहमद याची दुखापत देखील संघासाठी डोकेदुखी ठरली आहे. तस्कीन सध्या चांगल्या फॉरममध्ये आहे आणि एकदिवसीय मालिकेत त्याच्याकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा संघाला होती. पण मालिका सुरू होण्याआधीच त्याला पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळता येणार नसल्याचे सांगितले जात आहे. अशात तस्कीनची फिटनेस देखील मालिकेवर प्रभाव नक्कीच पाडू शकते.

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, कुलदीप सेन.

एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेश संघ:
नजमुल हुसैन शांतो, यासिर अली, आसिफ हुसैन, महमूदुल्लाह, मेहदी हसन, शाकिब अल हसन, अनामुल हक (यष्टीरक्षक), लिटन दास (यष्टीरक्षक), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), नुरुल हसन (यष्टीरक्षक), इबादत हुसैन, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, नासम अहमद, तस्कीन अहमद।

भारत-बांग्लादेश एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक 
पहिला सामना – 4 डिसेंबर, ढाका
दुसरा सामना – 7 डिसेंबर, ढाका
तिसरा सामना – 10 डिसेंबर, चटगांव

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यासाठी रवाना, ‘असे’ आहे वनडे आणि कसोटी मालिकेचे वेळापत्रक
बीसीसीआयने केली सल्लागार समितीची निवड, सदस्यांमध्ये ‘या’ माजी खेळाडूंचा समावेश 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---