U19 IND vs AUS : भारतीय संघाचे अंडर 19 ऑस्ट्रेलियाने स्वप्न भंग करत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर 79 धावांनी मात करत चौथ्यांदा अंडर 19 वर्ल्डकप जिंकला आहे. तसेच, ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये टीम इंडियाला विजयासाठी 254 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाचं 43.5 ओव्हरमध्ये 174 धावांवर पॅकअप झालं आहे.
टीम इंडियाकडून आदर्श सिंह याने सर्वाधिक 47 धावा केल्या. तर मुरुगन अभिषेक याने 42 धावा जोडल्या. मुशीर खान 22 धावा केल्या. तर नमन तिवारी 14 धावांवर नाबाद परतला. या व्यतिरिक्त भारतीय संघाचा कर्णधार उदय सहारन फक्त 8 धावा करून माघारी परतला होता. यामुळे कर्णधार उदय सहारनच्या नावावरती एका रेकॉर्डची नोंद देखील झाली आहे.
कर्णधार उदय सहारन अंतिम सामन्यांमध्ये विशेष काही करू न शकलेल्या कर्णधारांच्या यादीत त्याचा समावेश झाला आहे. याआधी या यादीमध्ये भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ आणि स्टार फलंदाज विराट कोहलीचा देखील समावेश आहे. याबरोबरच, अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत उन्मुक्त चंद वगळता इतर कोणत्याही खेळाडूला विशेश कामगिरी करता आली नाही.
याबरोबरच, अंडर 19 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात विराट कोहली, मोहम्मद कैफ आणि पृथ्वी शॉ यांच्यासह सर्व कर्णधारांनी फायनलमध्ये लवकर विकेट गमावल्या आहेत. तर या यादीत उदय सहारनच्या नावाचा देखील समावेश झाला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात उदय सहारनने 18 चेंडूंत 8 धावा करून बाद झाला आहे.
– 6 ODI World Cups.
– 4 U-19 World Cups.
– 2 Champions Trophy.
– 1 T20 World Cup.
– 1 World Test Championship.14th Trophy for the Australian Men's team. 🫡🏆 pic.twitter.com/z94LuCgbKd
— Johns. (@CricCrazyJohns) February 11, 2024
मोहम्मद कैफने 2000 मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात 18 धावा केल्या होत्या. तर 2006 मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात रविकांत केवळ 1 धाव करून बाद झाला होता. तसेच 2008 मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात विराट कोहली देखील फक्त 19 धावा करून बाद झाला होता. याव्यतिरिक्त इशान किशनने 2016 मध्ये 4 धावा केल्या होत्या. तर 2018 मध्ये पृथ्वी शॉ 29 धावा केल्या होत्या. याबरोबरच, प्रियम गर्गने 2020 मध्ये 7 धावा तर यश धुलने 2022 मध्ये 17 धावा केल्यानंतर त्याने त्याची विकेट गमावली होती.
दरम्यान, टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 84 दिवसांत हा दुसरा पराभव आहे. याआधी 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वरिष्ठ संघाने प्रथम फलंदाजी करताना 240 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 43 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला होता.
महत्वाच्या बातम्या –
- U19 WC Final । टीम इंडियाचा घाम काढणाऱ्या हरजस सिंगचे कुटुंब भारतात राहतं? खेळाडूने स्वतःच सांगितलं
- India vs England 3rd Test : राजकोटमध्ये पाच वर्षांनंतर होतोय सामना, पाहा कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? वाचा सविस्तर