दक्षिण आफ्रिका येथे खेळल्या जात असलेल्या महिला अंडर 19 टी20 विश्वचषकात अंतिम सामना भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान खेळला गेला. भारतीय संघाने या अंतिम सामन्यातील पहिल्या डावावर एकतर्फी वर्चस्व गाजवत इंग्लंडला केवळ 68 धावांवर सर्वबाद केले. शफाली वर्मा हिच्या नेतृत्वातील भारतीय संघाला आता विजेतेपद मिळवण्यासाठी केवळ 69 धावांची गरज आहे.
Innings Break!
Stupendous bowling effort from #TeamIndia as England are all out for 68 runs in 17.1 overs in the Finals of the #U19T20WorldCup 💪🙌#TeamIndia chase coming up shortly. Stay tuned!
Scorecard – https://t.co/a9WgSfFv8z #INDvENG #U19T20WorldCup #Final pic.twitter.com/bDqutAaxxm
— BCCI Women (@BCCIWomen) January 29, 2023
पोचेस्ट्राम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. उपांत्य सामन्यात एकतर्फी विजय मिळवलेल्या भारतीय संघासाठी गोलंदाजांनी हा अंतिम सामना अतिशय सोपा केला. स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत आलेल्या वेगवान गोलंदाज टिटस साधू हिने पहिल्या षटकात भारताला यश मिळवून दिले. त्यानंतर अर्चना देवी व पार्श्वी चोप्रा यांनी देखील तिला साथ दिली. तिघींनी मिळून इंग्लंडला केवळ 68 धावांवर सर्वबाद केले.
इंग्लंडसाठी केवळ चार खेळाडू दुहेरी धावसंख्या गाठू शकल्या. रायना मॅकडोनाल्ड गे हीने सर्वाधिक 19 धावांचे योगदान दिले. भारतासाठी टिटस, अर्चना व पार्शवी यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. तर, कर्णधार शफाली, मनात व सोनम यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. तर, इंग्लंडची एक खेळाडू धावबाद झाली. त्यामुळे आता भारताला विश्वचषक जिंकण्याची सोपी संधी असेल.
(U19 T20 World Cup India all out England on 68)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्या बात है! मिताली पुन्हा ठेवणार मैदानावर पाऊल, महिला आयपीएलमध्ये मिळाली ‘या’ संघाची मोठी जबाबदारी
IND vs NZ 2nd T20: भारत-न्यूझीलंडमध्ये कोण कुणावर भारी? वाचा आमने-सामने रेकॉर्ड काय सांगतो