U19 WC Final : 19 वर्षाखालील वर्ल्डकप 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 79 धावांनी पराभव करत आपले चौथे विजेतेपद पटकावले. U19 वर्ल्डकपमध्ये भारत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाकडून अंतिम सामन्यात पराभूत झाला आहे. तर अतिंम सामन्यात हरजास सिंगने दमदार फलंदाजी करत 55 धावांची खेळी केली होती. त्यानंतर ऑलिव्हर पिकने नाबाद 46 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 254 धावांचे आव्हान ठेवले होते. याबरोबरच, भारताकडून राज लिंबानीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या होत्या.
अंतिम सामन्यात धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ अपयशी ठरला असून भारताचा युवा संघ निर्धारित 50 षटकंदेखील खेळू शकला नाही. त्यामुळे टीम इंडियाला 43.5 षटकांत अवघ्या 174 धावांपर्यंत मजल मारता आली. यामध्ये सलामीवीर आदर्श सिंह (47) आणि खालच्या फळीत मुरुगन अभिषेक (42) या दोघांनी काही काळ प्रतिकार केला खरा, परंतु, या दोघांना दुसऱ्या कुठल्याच फलंदाजाकडून साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
याबरोबरच, अंतिम सामन्यात आदर्श सिंग आणि मुरुगन अभिषेकव्यतिरिक्त इतर कुठल्याही भारतीय फलंदाजाला खेळपट्टीवर टिकता आलं नाही. यामध्ये अर्शीन कुलकर्णी (3), कर्णधार उदय सहारन (8), मुशीर खान (22), सचिन धस (9), प्रियांशू मोलिया (9), अरवली अविनाश राव (0), राज लिंबानी (0), सौमी कुमार (2) हे खेळाडू सपशेळ अपयशी ठरले. तर नमन तिवारी ११ धावांवर नाबाद राहिला आहे.
तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार ह्यू वैबगेनने सर्व गोलंदाजांचा पुरेपूर वापर केला असून प्रत्येक गोलदांजाकडून योग्य वेळी हव्या त्या पद्धतीने गोलंदाजी करून घेतली. त्यामुळे भारतीय फलंदाजाला डोकं वर काढण्याची संधी मिळाली नाही. तसेच ऑस्ट्रेलियाकडून राफेल मॅकमिलन याने 3, मह्ली बीअर्डमनने 3 आणि कॉलम विडलरने 2 बळी घेतले तर, चार्ली अँडरसन आणि टॉम स्ट्रॅकरने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केलं आहे.
दरम्यान, अंतिम सामन्यातील पराभवानंतर सर्वत्र चर्चा सुरू असताना भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने भारताच्या पराभवाचं सविस्तर कारण सांगितले आहे. तसेच समालोचन करताना कैफ म्हणाला होता की, भारताच्या संघाने या सामन्यात आणखी एक जलदगती गोलंदाजाला संधी द्यायला हवी होती. तसेच भारताने पहिल्या डावात गोलंदाजी करताना सुरुवातीच्या 20 पैकी 6 षटकं जलदगती गोलंदाजाी केली.
तर, उर्वरित 14 षटकं फिरकीपटूंनी टाकली. तर या 20 षटकांमध्ये भारताला केवळ एक बळी मिळवता आला. हा बळी जलदगती गोलंदाज राज लिंबानी याने घेतला होता. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या 20 षटकांपैकी 19 षटकं जलदगती गोलंदाजांनी गोलंदाजी केली. तर केवळ एकाच षटक हे फिरकीपटूने टाकले होते. परिणामी पहिल्या 20 षटकांत भारत केवळ 68 धावा जमवू शकला. तसेच भारताचे चार फलंदाज माघारी परतले होते.
महत्वाच्या बातम्या –
U19 WC Final । भारताचा बदला अपुराच! अंडर 19 वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून यंग इंडियाही पराभूत