आबु धाबी। मुंबई इंडियन्समधील ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नॅथन कुल्टर नाईलने एक विधान केले आहे. त्याच्या मते, युएईची खेळपट्टी त्याच्या गोलंदाजीला अनुकूल आहे.
आयपीएलच्या आगामी हंगामात त्याने फलंदाजीत आणि गोलंदाजीतही चांगली कामगिरी करावी अशी अपेक्षा आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमुळे आयपीएलचा 13 वा हंगाम दुबई, आबु धाबी आणि युएई मधील शारजाह येथे खेळला जात आहे.
संघाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कुल्टर नाईल म्हणाला, “मुंबईत जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत. मी संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. येथील खेळपट्ट्या माझ्या गोलंदाजीला अनुकूल आहेत आणि माझा माझ्यावर विश्वास आहे.”
NCN is back between faMIliar faces! 💙
Can you tell us who all from the current squad were his teammates back in 2013? 🤔#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL pic.twitter.com/YJ2FUpywjG
— Mumbai Indians (@mipaltan) September 11, 2020
नाईल 2013 मध्ये मुंबई इंडियन्सचा भाग होता पण त्यावेळी त्याला खेळायला जास्त संधी मिळाली नव्हती. गेल्या वर्षी झालेल्या लिलावात मुंबई इडियन्स संघाने त्याला ८ कोटींमध्ये विकत घेतले होते. त्याने आतापर्यंत आयपीएलचे २६ सामने खेळले आहेत. त्यात त्याने १९.९७ च्या सरासरीने ३६ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-राजस्थान रॉयल्सची चिंता वाढली; हा स्टार खेळाडू झालाय दुखापतग्रस्त
-चेन्नई सुपर किंग्सने रैनाच्या जागी इंग्लंडच्या डेव्हिड मलानला संघात स्थान देण्यास दिला नकार, कारण…
-माजी क्रिकेटरने सांगितले आयपीएल २०२०च्या विजेत्या संघाचे नाव, पहा रोहित-धोनी का तिसरचं…
ट्रेंडिंग लेख-
-आपल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या नाकी नऊ आणण्यासाठी कार्तिक निवडेल ‘या’ ११ शिलेदारांना
-अजूनही आयपीएल खेळत असते तर, हे ५ परदेशी खेळाडू झाले असते सुपर डुपर हिट
-या ३ कारणांमुळे आयपीएल २०२० चॅम्पियन बनणार किंग्ज इलेव्हन पंजाब संघ?