---Advertisement---

टी20 वर्ल्डकपसाठी क्वालिफाय होत युगांडाने रचला इतिहास! झिम्बाब्वेची हुकली वर्ल्डकप वारी

---Advertisement---

पुढील वर्षी वेस्ट इंडीज व अमेरिका येथे होणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेसाठीची अखेरची पात्रता फेरी खेळली जात आहे. आफ्रिका विभागीय पात्रता फेरीतून दोन संघ थेट विश्वचषकासाठी पात्र होणार होते. नामिबियाने यापूर्वी पात्रता मिळवली असताना, युगांडाने रवांडा संघावर विजय मिळवत प्रथमच विश्वचषक खेळण्यासाठी पात्र होण्याचा मान मिळवला. त्यामुळे आता झिम्बाब्वे व केनिया या संघांना विश्वचषकात सहभागी होता येणार नाही.

या विश्वचषकासाठी एकूण वीस संघ पात्र ठरणार होते. जगभरातील इतर विभागीय स्पर्धांमधून 18 संघ यापूर्वीच निश्चित झालेले. तर, नामिबियाणे आपल्या पहिल्या पाच सामन्यांमध्ये विजय मिळवत आफ्रिका विभागातील एक जागा नक्की केली होती. तर दुसऱ्या जागेसाठी प्रामुख्याने युगांडा व झिम्बाब्वे यांच्या दरम्यान लढत दिसून आली. साखळी फेरीत झालेल्या सामन्यात युगांडाने झिम्बाब्वेचा पराभव केला होता. त्यामुळे आपल्या अखेरच्या साखळीत लढतीत युगांडाला विजय मिळवणे अनिवार्य होते.

रवांडा संघाला प्रथम फलंदाजी करताना केवळ 65 धावांवर गुंडाळत त्यांनी हे आव्हान एक गडी गमावत पार केले. यासोबतच त्यांनी विश्वचषकासाठी पात्रता देखील मिळवली. त्यामुळे मागील वर्षी पाकिस्तानला हरवून खळबळ उडवणाऱ्या झिम्बाब्वे संघाला विश्वचषकात सहभागी होता येणार नाही.

युगांडा संघ या विजयासह प्रथमच विश्वचषक खेळेल. वेस्ट इंडीज व अमेरिका येथे होणाऱ्या या विश्वचषकात आता दक्षिण आफ्रिका, युगांडा, नामिबिया हे तीन आफ्रिका खंडातील देश खेळताना दिसणार आहेत. पुढील वर्षी 3 जून ते 30 जून या कालावधीत ही स्पर्धा पार पडेल.

(Uganda Cricket Team Qualify For T20 World Cup 2024 Zimbabwe Missed Out)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---