पुणे: पहिल्या अल्टिमेट खो खो स्पर्धेत गुजरात जयंट्स संघाने तेलगु योद्धाज संघांचा 51-48 असा केवळ तीन गुणांच्या फरकाने रोमांचकारी पराभव करताना आगेकूच कायम राखली. ओडिशा जगरनट्स संघाने राजस्थान वॉरियर्स संघाला 6गुणांच्या फरकाने पराभुत करून प्रथमच गुण तालिकेत अग्रस्थानी झेप घेतली.
ओडिशा ससंघाने हा सामना 51-45 असा जिंकताना या मौसमातील पाचचव्या विजयाची नोंद केली. त्याउलट राजस्थानचा हा सलग सहावा पराभव ठरला. ओडिशा संघाचे आता 15 गुण झाले असून त्यांनी तेलगु योद्धाज(12गुण) संघाला दुसऱ्या क्रमांकावर ढकलून पाहिले स्थान मिळवले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सामन्यात पी शिवरेड्डी याने संरक्षणात 3मिनिटे 18 सेकंद तर आक्रमणात 3 गुण नोंदवताना गुजरातच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. कर्णधार रंजन शेट्टी आणि अभिनंदन पाटील यांनी प्रत्येकी 9 गुणांची नोंद करताना त्याला उत्कृष्ट साथ दिली.
दिवसातील अत्यंत चुरशीच्या सामन्यात गुजरात जयंट्स आणि तेलगु योद्धाज या दोन सर्वोत्तम संघांमध्ये पहिल्या डावा अखेर 27-27 अशी बरोबरी झाली होती. तिसऱ्या सत्रात शिवा रेड्डीने 3मिनिटे 18 सेकंद संरक्षण करूनही तेलगु योद्धाजने गुजरात जायंट्सवर 46-31 अशी आघाडी मिळवली. अखेरच्या सात मिनिटात गुजरात संघ 46-48 असा पिछाडीवर असताना शिवा रेड्डीने तीन महत्त्वाचे गुण मिळवून आपल्या संघाला वर्चस्व मिळवून दिले. हे वर्चस्व कायम राखताना गुजरात संघाने तेलगु योद्धाजवर निसटता विजय मिळवला.
पहिल्या सामन्यात निलेश जाधवने सहा बळींसह एकूण 16 गुणांची कमाई करताना ओडिशाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. एमके गौतम ने सहा गुण मिळवताना त्याला चांगली साथ दिली.
राजस्थानकडून वझीर ऋषिकेश मुरतावडे याने सात गुण मिळवताना दिलेली झुंज एकाकी ठरली.
त्याआधी ओडिशाने नाणेफेक जिंकून संरक्षण स्वीकारले. राजस्थानने पावर प्लेचा वापर करताना ओडिशाची पहिली तुकडी 1मिनिटे 32 सेकंदात गार केली. परंतु दुसऱ्या तुकडीतील निलेश जाधव आणि एम के गौतम यांनी अनुक्रमे 3मिनिटे 2 सेकंद आणि 3मिनिटे 32 सेकंद संरक्षण करताना ओडिशाला 4 बोनस गुण मिळवून दिले. तिसऱ्या तुकडीतील सूरज लांडे नाबाद राहिला.पहिल्या सात मिनिटाअखेर राजस्थान 21-04 असा आघाडीवर राहिला.
दुसऱ्या सत्रात ओडिशाने पावर प्ले घेऊनही अक्षय गणपुळे(2मिनिटे 35 सेकंद), ऋषिकेश मुरतावडे व दिलराज सिंग सेंगर (3मिनिटे 25 सेकंद) यांच्या मुळे राजस्थानला बोनस गुण मिळाले. निलेश जाधव ने मोहम्मद तासीनला बाद केले परंतु बाकी दोन्ही खेळाडू नाबाद राहिल्याने पहिल्या डावा अखेर राजस्थानकडे 27-21 अशी आघाडी राहिली.
तिसऱ्या सत्रात राजस्थानने ओडिशाची पहिली तुकडी 1मिनिटे 55 सेकंदात बाद करून आपली आघाडी 35-21 अशी वाढवली. दुसऱ्या तुकडीच्या वेळी राजस्थानच्या फाउल मुळे दिपेश मोरे(3मि 58 सेकंद) आणि दिलीप खांडवी यांनी ओडिशाला बहुमोल बोनस गुण मिळवून दिले तरीही तिसऱ्या सत्रा अखेर राजस्थान 43-27 असा आघाडीवर होता.
चौथ्या सत्रात ओडिशाला विजयासाठी 17 गुणांची गरज होती. भरत स्वयंचित झाला तर, गौतमने धनंजय सिंगला तर महेश ने भुवनेश्वर साहूला स्काय डाईव्हच्या साहाय्याने बाद करून ओडिशाची पिछाडी 36-43 अशी कमी केली.याचवेळी ओडिशाने पावर प्लेचा वापर केला. अत्यंत मोक्याच्या क्षणी निलेश ने सतीशला बाद केले तर, गौतमने अप्रतिम सूर मारत अभिजीत पाटीलला तंबूत परतवून गुणफलक 42-23 पर्यंत नेला.
यावेळी अक्षय गणपुळेने अखेरच्या क्षणी राजस्थानला बोनस गुण मिळवुन दिले. परंतु तो बाद झाल्याने सामना 45-45 असा बरोबरीत गेला. तिसऱ्या तुकडीकडे 1मिनिटे 55 सेकंद वेळ शिल्लक होता. त्यामुळे बोनस गुण मिळू शकत नव्हता. याचवेळी दिनेश नाईकने सुरेश सावंत ला बाद करून ओडिशाला 48-45 असे आघाडीवर नेलं. ऋषिकेश नाबाद राहिला परंतु ओडिशाने अखेरच्या क्षणी राजस्थानच्या दिलराजला बाद करून 51-45 अशा विजयाची निश्चिती केली.
शुक्रवारी, चेन्नई क्विक गन्स विरुद्ध मुंबई खिलाडीज यांच्यात तर, गुजरात जायंट्स विरुद्ध तेलगु योद्धाज यांच्यात सामना होणार आहे.
अमित बर्मन यांनी पुरस्कृत केलेल्या अखिल भारतीय खो खो फेडरेशनच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेचे प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर ही लीग पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसारित करण्यात येणार आहे. सोनी टेन 1 (इंग्रजी), सोनी टेन 3 (हिंदी आणि मराठी), सोनी टेन 4 (तेलुगु आणि तमिळ) चॅनेलवरून अल्टीमेट खो खोचे थेट कव्हरेज दररोज संध्याकाळी 7:00 वाजता सुरू प्रसारित करण्यात येणार आहे. लीग प्रीमियम ओटीटी प्लॅटफॉर्म, सोनी लाईव्हवर लाइव्ह-स्ट्रीम देखील करण्यात येणार आहे.
शत्रू नव्हे प्रतिस्पर्धी! विराटच्या पुनरागमनासाठी आफ्रिदी करतोय प्रार्थना, व्हिडिओ जिंकेल मन
नवी जर्सी समोर आली रे..! एशिया कपसाठी अशी आहे भारताची जर्सी, लोगोवरील ३ स्टार्सचे खास महत्त्व